महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। मंगळवार दि. १८ फेब्रुवारी ।। राज्य सरकारने महिलांसाठी खास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे. लाडकी बहीण योजनेत गरीब कुटुंबातील महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. या योजनेत हप्ता वाढवण्याचे आश्वासन दिले होते. लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी येणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, हप्ता कधी येणार याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माहिती दिली आहे. (Ladki Bahin Yojana)
अजित पवारांनी म्हटलंय की, फेब्रुवारी हप्ता आठ दिवसांत जमा होणार आहे. जालन्यातली एका कार्यक्रमात त्यांनी हे सांगितलं आहे. जालन्याला येण्याआधी ३५०० कोटी रुपयांच्या चेकवर सही करुन आलोय, असंही त्यांनी सांगितले आहे. येणाऱ्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, असंही त्यांनी सांगितलं. तसेच ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी या योजनेचा लाभ घेतला नाही पाहिजे हे कुठेतरी थांबायला हवं. असंही अजित पवारांची म्हटलं आहे.
ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी योजनेचा लाभ गेणे बरोबर नसल्याचं अजित पवारांनी म्हटलंय. कुठेतरी चांगली योजना आणायची. जी त्या घटकासाठी आणली आहे. आणि त्या घटकाला त्याचा फायदा होण्याऐवजी ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी फायदा घेणे बरोबर नाही, हे कुठेतरी थांबलं पाहिजे, असंही ते म्हणाले.
शेतकाम करणाऱ्या महिला, धुणीभांडी करणाऱ्या महिला, स्वयंपाक करणाऱ्या महिला, गरीब महिला यांच्यासाठी ही योजना आणली आहे. ज्या महिलांचं उत्पन्न हे वीस हजार रुपये आहे, अशा महिला या योजनेसाठी पात्र आहे. ज्या महिलांना इतर कोणत्याही योजनाचा लाभ मिळत नाही त्यांच्यासाठी ही योजना आहे. या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना दोन अपत्य असावी, अशी चर्चा सुरु होती. मात्र, नंतर असं लक्षात आलं की ज्यांचा पगार चाळीस हजार रुपये आहे. घरी चारचाकी गाडी आहे अशा महिला या योजनेता लाभ घेत आहेत. मात्र, आता ते पैसे परत घेणार नाही. भाऊबीज, राखी पोर्णिमा भेट परत घेणे ही आपली संस्कृती नाही काही महिलांनी नावे मागे घेतली आहेत, असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.