ट्रम्प पुन्हा देणार दणका ! ऑटोमोबाइलवर २५ टक्के कर आकारणार; चिप, औषधांवरही वाढीव कराचा विचार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। गुरूवार दि. २० फेब्रुवारी ।। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झालेले डोनाल्ड ट्रम्प पुन्हा जगाला तडाखा देण्याच्या तयारीत आहेत. ट्रम्प यांनी मंगळवारी ऑटोमोबाइल क्षेत्रावर २५ टक्के कर लावण्याचे संकेत देतानाच सेमीकंडक्टर चीप आणि औषधांच्या आयातीवरही आयातशुल्क आकारणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे नजीकच्या काळात जागतिक व्यापारात मोठे बदल झालेले पाहायला मिळतील, असे वृत्तसंस्थांनी म्हटले आहे. या घोषणेमुळे भारतील औषध कंपन्यांचे शेअरमध्ये बुधवारी घसरण झाली.

शुक्रवारी ट्रम्प यांनी जाहीर केले की, ऑटोमोबाईलवरील कर २ एप्रिलपासून लागू करण्यात येईल. परदेशी बाजारपेठांमध्ये अमेरिकन ऑटोमोबाईल निर्यातीवर अन्याय केला जातो, असा दावा ट्रम्प सतत करतात. युरोपात वाहन आयातीवर १०% ड्युटी लागते जी अमेरिकेत २.५% आहे. युरोपियन देशांनी कर कमी करावा असे त्यांना वाटते.

चिप, औषधांवर कर कधीपासून?फ्लोरिडामध्ये मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना रम्प यांनी सांगितले की, फार्मास्युटिकल आणि सेमिकंडक्टर चिप्सवरही २५% किंवा त्याहून अधिक कर लावला जाईल. हा कर वर्षभरानंतर आणखी वाढवला जाऊ शकतो.

येणाऱ्या काही आठवड्यात जगातील नामांकित कंपन्या अमरेरिकेत गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळेच परंतु हा कर नक्की कधी लावला जाईल, हे त्यांनी स्पष्ट केले नाही.

रेसिप्रोकल टॅरिफची तयारी
गेल्या आठवड्यात ट्रम्प यांनी आर्थिक टीमला रेसिप्रोकल टॅरिफ लागू करण्याची योजना तयार करण्याचे निर्देश दिले होते. या योजनेंतर्गत, प्रत्येक देशाने अमेरिकन उत्पादनांवर लावलेल्या टॅरिफप्रमाणेच अमेरिका त्या देशाच्या उत्पादनांवर समान दराने टॅरिफ लावणार आहे.

युरोपियन युनियनची भूमिका काय?
युरोपियन युनियनचे व्यापार प्रमुख मारोस सेफकोविक अमेरिकेच्या वाणिज्य सचिव विल्बर रॉस, व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर आणि राष्ट्रीय आर्थिक परिषदेचे संचालक केविन हैसेट यांच्यासोबत भेट घेऊन ट्रम्प यांनी प्रस्तावित केलेल्या टॅरिफबद्दल चर्चा करणार आहेत.

या पार्श्वभूमीवर युरोपियन यूनियन अमेरिकेइतके कर कमी करण्याचा विचार करू शकते का, असे विचारताच खासदारांना नकार दिला आहे.

भारतात कोणत्या कंपन्यांवर परिणाम? : एचएसबीसीच्या अहवालानुसार, भारतीय औषध कंपन्यांचा अमेरिकेत मोठा बाजार आहे. अनेक कंपन्यांना अमेरिकेवर मोठी कमाई मिळते. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे या कंपन्यांच्या उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो. अरबिंदो फार्माची ४६% कमाई अमेरिकेतून होते. सिप्लाची २८%, लुपिनची ३७%, डॉ. रेड्डीज लॅबची ४६% आणि टॉरंट फार्मास्युटिकल्सची १०% कमाई एकट्या अमेरिकेतील व्यापारातून होत असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *