महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। गुरूवार दि. २० फेब्रुवारी ।। श्रीमंत राजे पवार घराण्याकडून प्रतिवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा भव्य धार पवार स्वराज्य रथ सोहळ्याचे आयोजन केलं होतं. या सोहळ्याला असंख्य शिवभक्त तसेच सर्व बंधू भगिनींनी पारंपारिक पोषाखात आवर्जुन उपस्थित राहून रथ यात्रेची शोभा वाढवली.
रथयात्रा सकाळी 11 वाजता तांबडी जोगेश्वरी मंदिर. अप्पा बळवंत चौक येथुन सुरू झाली, रथाचे उदघाटन ऍड सुभाषराव पवार (माजी अध्यक्ष पुणे बार असोशियन) संजय अप्पासाहेब पवार (तहसीलदार, रस्ते विकास महामंडळ, बेलापूर, नवी मुंबई)श्री अनिल दुधाने (पवार) (प्रगतगील शेतकरी व वीरगळ संशोधक.) संस्थापक अध्यक्ष सागर पवार , यांची उपस्तिथी होती .