महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। गुरूवार दि. २० फेब्रुवारी ।। हांडे देशमुख घराण्याचा थोडक्यात इतिहास,तुकोजी बिन त्रिबंकजी हांडे देशमुख सरकार जुन्नर, इ.स. १७४० हांडे देशमुख घराण्याचा उदय १३ व्या शतकात झाला. बहामनी साम्राज्याच्या काळात हांडे एक मोठे उमराव घराणे म्हणून प्रसिद्ध होते. बहामनी साम्राज्याच्या काळात हांडे घराण्यांनी मोठा पराक्रम केला. पुढे हांडे देशमुख घराण्याला १४८४ गाव वतन मिळाले. देवराव हांडे हे हांडे देशमुख घराण्याचे मूळपुरूष म्हणून ओळखले जातात. महाबली महाराज शहाजीराजे यांच्या काळात यशवंतराव हांडे देशमुख यांची शहाजीराजांना साथ होती. अनेक किल्ल्यांच्या व्यवस्थापनात हांडेंचा सहभाग होता. राजमाता जिजाऊ आईसाहेब या जुन्नरच्या हांडे वाड्यात वास्तव्यास होत्या. शंभुपुत्र शाहू महाराजांच्या काळात रायाजी हांडे छत्रपतींच्या दरबारात सरदार होते. जुन्नर प्रांतातील ५३१ गावांचा ‘देशमुख’ म्हणून हांडे यांचा उल्लेखसापडतो. पुढील काळात महादजी शिंदे यांची एक पत्नी भागिरथीबाई हांडे यांचीकन्या होती. दत्ताजी पाटील शिंदे यांची कन्या जानराव हांडे देशमुखास दिली होती. १८५७ च्या उठावात आबाजी हांडे देशमुख यांनी इंग्रजांचे घोडे पळवले होते. १८७५ सालच्या दख्खनच्या दंग्यांची सुरुवात बाबासाहेब हांडे देशमुख यांनीच केली होती.
रथयात्रा सकाळी 11 वाजता सुरू झाली, रथ यात्रेत मोठ्या संख्येने शिवभक्तांनी घेतलेला सहभाग हा लक्षवेधी ठरत होता.