महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शनीवार दि. २२ फेब्रुवारी ।। टॅरिफ (शुल्क) वाढीमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांच्यावर संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे. ट्रम्प यांनी अलीकडेच भारतासह इतर अनेक व्यापार भागीदार असलेल्या देशांवर परस्पर शुल्क लादण्याची घोषणा केली. स्थानिक व्यवसायाची भरभराट आपण असं करत असल्याचं सांगत ट्रम्प यांनी आपल्या धडाकेबाज निर्णयाचे पाठराखण केली.
भारतासह जगातील अनेक देशही असंच करत असून आता भारतही आपल्या स्थानिक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पुढे सरसावला आहे. भारत वनस्पती तेलांच्या आयातीवरील कर वाढवण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.
खाद्यतेलाच्या आयातीवर कर वाढणार?
रॉयटर्सच्या माहितीनुसार भारत आपल्या हजारो तेलबिया उत्पादकांना देशांतर्गत तेलबियांच्या किमती घसरण्यापासून दिलासा देण्यासाठी वनस्पती तेलांवरील आयात करात वाढ करण्याची सरकारी सूत्रांनी माहिती दिली. अशा परिस्थितीत, सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीत दुसऱ्यांदा वनस्पती तेलांवरील आयात कर वाढू शकतो. सध्या शेतकऱ्यांना वनस्पती तेलाचे मोठे नुकसान होत असून यामुळे सरकार त्यांना मदत म्हणून आयात करात वाढीचा निर्णय घेऊ शकते.
सप्टेंबर २०२४ मध्ये कच्च्या आणि शुद्ध वनस्पती तेलांवर भारताने २०% मूलभूत सीमाशुल्क लादले. तर सुधारणेनंतर, कच्चे पाम तेल, कच्चे सोया तेल आणि कच्चे सूर्यफूल तेलावर २७.५% आयात शुल्क आकारले जाते, जे याआधी ५.५% होते. त्याचवेळी, या तिन्ही तेलांच्या रिफाइंड ग्रेडवर आता ३५.७५% आयात टॅक्स आकारला जातो.
खाद्यतेल महागण्याची शक्यता
जगातील सर्वात मोठा खाद्यतेल आयात करणारा देश म्हणून प्रख्यात भारताने खाद्यतेलावरील आयात कर वाढवल्यास इतर देशांकडून जास्त किमतीत वनस्पती तेल खरेदी करावे लागेल आणि तोटा भरून काढण्यासाठी इतर देश तेलाच्या किमती वाढवतील. परिणामी भारतीय बाजारात वनस्पती तेल लोकांना वाढीव किमतीत खरेदी करावे लागेल. यासोबतच, मागणी कमी होऊ शकते म्हणून परदेशातून पाम तेल, सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेल यासारख्या वस्तूंची खरेदी कमी होऊ शकते.
भारत आपल्या वनस्पती तेलाच्या मागणीपैकी सुमारे दोन तृतीयांश आयातीद्वारे प्रामुख्याने इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंड येथून पूर्ण करतो. त्याचवेळी, आपण अर्जेंटिना, ब्राझील, रशिया आणि युक्रेनमधून सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेल आयात करते.