महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। मंगळवार दि. २५ फेब्रुवारी ।। आज पाकिस्तानमधल्या रावळपिंडीमध्ये दक्षिण अफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना खेळला जाणार होता. पण पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला आहे. वातावरण खराब झाल्याने नाणेफेकदेखील झाली नाही. सामना काही काळानंतर सुरु होणार असल्याची काही वेळापूर्वी शक्यता वर्तवली जात होती. पण हवामानात सुधारणा होत नसल्याने हा नियोजित सामना रद्द करण्यात आला.