महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। बुधवार दि. २६ फेब्रुवारी ।। 2025 मधील मार्च हा महिना सुरु होण्यास दोन दिवसांचा वेळ बाकी आहे. मार्च महिन्यात होळी आणि इतर सण असल्यानं देशभरात सार्वजनिक सुट्टी असेल. काही सुट्ट्या या देशभरात लागू असतील तर काही सुट्ट्या राज्य पातळीवर लागू असतील. वेगवेगळ्या राज्यांमध्ये बँका वेगवेगळ्या दिवशी सुरु राहतील. बँकांच्या सुट्ट्यांचं वेळापत्रक पाहून तुम्ही तुमच्या आर्थिक नियोजनाची सुरुवात केली पाहिजे.
मार्च महिन्यात सलग सुट्टी राहणार आहे. मार्चमध्ये जोडून सुट्ट्या आल्यानं तुम्ही मित्र आणि कुटुंबीयांना वेळ देऊ शकता, त्यांच्यासोबत पर्यटनाचा प्लॅन देखील करु शकता.
भारतात राष्ट्रीय सुट्टी असल्यास ती संपूर्ण राज्यांमध्ये लागू असते. काही प्रादेशिक पातळीवरील सुट्ट्या असतात त्या राज्यात लागू असतात.
मार्च महिन्यातील सार्वजनिक आणि बँक सुट्ट्यांची यादी
1 मार्च : रामकृष्ण जयंती, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आसामध्ये लागू
13 मार्च : छोटी होळी, होलिका दहन, देशभर सु्ट्टी लागू
14 मार्च : होळी, संपूर्ण देशभर लागू
20 मार्च : पारसी नववर्ष (जमशेदी नवरोज), महाराष्ट्र आणि गुजरात
23 मार्च : जमात उल-विदा, जम्मू काश्मीर, केरळ, उत्तर प्रदेश (चंद्र दिसण्यावर आधारित)
याशिवाय बँका रविवार म्हणजेच 2 मार्च, 9 मार्च, 16 मार्च, 23 मार्च, 30 मार्च या दिवशी बंद राहतील. दुसरा अन् चौथा शनिवार म्हणजेच 8 आणि 22 मार्चला देखील बँका बंद राहणार आहेत.
मार्च महिन्यात अनेक सुट्ट्या आहेत, काही धार्मिक उत्सव देखील आहेत. याशिवाय होळी सारखा देशभर साजरा होणारा सण आहे. राष्ट्रीय आणि प्रादेशिक म्हणजेच राज्य स्तरावर वेगवेगळ्या दिवशी बँकांना सुट्ट्या राहतील. बँकांना कधी सुट्टी असेल याची माहिती घेऊन आर्थिक नियोजन करावं.
महाराष्ट्रात गुढी पाडव्याला सुट्टी
महाराष्ट्रात गुढी पाडवा हा सण 30 मार्चला साजरा केला जाणार आहे. या निमित्तानं देखील सुट्टी असेल. मात्र, या दिवशी रविवार असल्यानं वेगळी सुट्टी राहणार नाही. गुढी पाडवा सण मराठी नववर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जातो.
दरम्यान, सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी तुम्ही कुठे फिरायला जाणार असाल तर सुट्टी कोणत्या दिवशी आहे हे पाहून त्याचं नियोजन करणं आवश्यक आहे.