Champions Trophy: सेमीफायनलपासून एक पाऊल दूर अफगाणिस्तानचा संघ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। गुरुवार दि. २७ फेब्रुवारी ।। वनडे वर्ल्डकप २०२३नंतर पुन्हा एकदा अफगाणिस्तान क्रिकेट संघाने आपला जलवा दाखवण्यास सुरूवात केली आहे. यावेळेस अफगाणिस्तानच्या संघाने ही धमाल आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५मध्ये केली आहे. त्यांनी मोठा उलटफेर करताना सेमीफायनलमध्ये आपली दावेदारी सिद्ध केली आहे.

खरंतर, यावेळेस आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ पाकिस्तानच्या यजमानपदाखाली खेळवला जात आहे. ग्रुप एमध्ये भारत आणि न्यूझीलंड संघाने सेमीफायनलमध्ये एंट्री घेतली आहे. तर ग्रुप बीमध्ये समीकरण रंजक झाले आहे. जर ऑस्ट्रेलियाचा संघ सतर्क झाला नाही तर ते बाहेर होऊ शकतात.

अफगाणिस्तानने इंग्लंडला हरवत केले बाहेर
ग्रुप बी मध्ये रोमहर्षक सामना बुधवारी खेळवण्यात आला. या सामन्यात चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५मधील मोठा उलटफेर पाहायला मिळाला. कमकुवत समजला जाणाऱ्या अफगाणिस्तानी संघाने इंग्लंडला ८ धावांनी हरवले. या पराभवासह जोस बटलरच्या नेतृत्वातील इंग्लंडचा संघ स्पर्धेबाहेर गेला आहे. तर अफगाणिस्तानचा संघ अद्याप सेमीफायनलच्या शर्यतीत आहे. त्यांचा पुढील सामना ऑस्ट्रेलियाशी आहे. अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना २८ फेब्रुवारीला होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *