Chhaava : ‘छावा’ची डरकाळी आता टॉलिवूडमध्ये ऐकू येणार, चित्रपटाची रिलीज डेट काय?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। गुरुवार दि. २७ फेब्रुवारी ।। सध्या ‘छावा’चे (Chhaava ) शो हाऊसफुल पाहायला मिळत आहे. प्रेक्षक मोठ्या संख्येने ‘छावा’ पाहायला जात आहेत. ‘छावा’ चित्रपट 14 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) , महाराणी येसूबाईची भूमिकेत रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना (Akshaye Khanna) झळकला आहे. तसचे चित्रपटात अनेक मराठी कलाकार देखील पाहायला मिळत आहे.

‘छावा’ची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. हा चित्रपट आता लवकरच 400 कोटींचा टप्पा पार करणार आहे. ‘छावा’ची लोकप्रियता पाहून आता हा चित्रपट एका नवीन भाषेत प्रदर्शित होणार आहे. ‘छावा’च्या निर्मात्यांनी एक मोठी घोषणा केली आहे. ‘छावा’ चित्रपट आता तेलुगू भाषेत (Telugu Movie) प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

मॅडडॉक फिल्म्सने केलेल्या पोस्टमध्ये असे लिहिलं आहे की, “भारताच्या धाडसी महापुरुषाची कथा ‘छावा’ चित्रपटाच्या माध्यमातून आता तेलुगू भाषेत गर्जना करण्यासाठी सज्ज आहे. ७ मार्चपासून ‘छावा’ चित्रपट तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. ” या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. ‘छावा’साठी प्रेक्षक आतुर आहेत. आता ‘छावा’ चित्रपट मराठी भाषेत सुद्धा प्रदर्शित करण्यात यावा अशी मागणी मराठी प्रेक्षकांकडून करण्यात येत आहे. अशा अनेक कमेंट्स पोस्टवर पाहायला मिळत आहे.

https://www.instagram.com/vickykaushal09/?utm_source=ig_embed&ig_rid=e8554090-bf8f-4f13-aa1e-d053f2a8ec2f

‘छावा’ बॉक्स ऑफिस कलेक्शन
‘छावा’ चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवण्यात आली आहे. ‘छावा’ चित्रपट 130 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवला आहे. ‘छावा’चे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. तेरा दिवसात ‘छावा’ चित्रपटाने तब्बल 385 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *