महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। गुरुवार दि. २७ फेब्रुवारी ।। अफगाणिस्तान आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये काय सामना रंगला. सुरुवातीला अफगाणिस्तानने ३२५ धावांचा डोंगर उभारला. अफगाणिस्तानचे फिरकी गोलंदाज पाहून असं वाटलं होतं की, अफगाणिस्तान हा सामना एकहाती जिंकेल. मात्र इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूटने आपला संपूर्ण अनुभव पणाला लावत शानदार शतकी खेळी केली.
इंग्लंडचा संघ विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला होता. मात्र शेवटी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी सामना फिरवला. या विजयासह अफगाणिस्तानने सेमी फायनलमध्ये जाण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. दरम्यान अफगाणिस्तानसाठी कसं असेल सेमी फायनलमध्ये जाण्याचं समीकरण? समजून घ्या.
अफगाणिस्तानने आतापर्यंत या स्पर्धेत २ सामने खेळले आहेत. पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानला दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाचा सामना करावा लागला. आता इंग्लंडला हरवून अफगाणिस्तानने कमबॅक केलं आहे. अफगाणिस्तानचा शेवटचा सामना २८ फेब्रुवारीला ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे.
ऑस्ट्रेलियालाही सेमी फायनलमध्ये जाण्याची संधी आहे . कारण या संघाने पहिल्या सामन्यात इंग्लंडला धूळ चारली. मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेला दुसरा सामना पावसामुळे धुतला गेला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी १–१ गुण दिला गेला. याचा फटका दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांना बसला.
असा मिळू शकतो दक्षिण आफ्रिकेला प्रवेश
अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणारा सामना हा अतिशय महत्वाचा असणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी करो या मरो सामना असणार आहे. जर अफगाणिस्तानने हा सामना जिंकला तर हा संघ सलग दुसऱ्यांदा आयसीसी स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये प्रवेश करेल. मात्र हा सामना गमावला किंवा पावसामुळे रद्द झाला तर, अफगाणिस्तान सेमी फायनलमध्ये जाण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे अफगाणिस्तानला हा सामना जिंकावाच लागेल.
