Family Trip March: मार्चमध्ये फिराण्यासारखी भारतातील हि काही ठिकाण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ मार्च ।। मार्च महिन्याच्या सुट्टीत किंवा इतर कधीही कुटुंबासोबत ट्रिप प्लॅन केल्यास तुमचं जीवन अधिक सुंदर आणि आनंददायक होईल. आणि जेव्हा ते आपल्या कुटुंबासोबत असतं, तेव्हा अनुभव खरंच अविस्मरणीय होतो.

फॅमिलीसोबत फिरायला जाणे म्हणजे स्वर्गासमान अनुभव, कारण कुटुंब एकत्र असताना प्रवासाचा आनंद दोन पटीने वाढतो. म्हणूनच, जर तुम्ही कुटुंबासोबत ट्रिप प्लॅन करत असाल, तर भारतामध्ये असंख्य आकर्षक ठिकाणं आहेत जिथे तुम्ही भरपूर धमाल करू शकता.

केरल
केरलच्या बॅकवॉटर्समध्ये घरबोट सवारी करणं आणि समुद्रकिनाऱ्यावर आराम करणं एक सुंदर अनुभव असतो. आलापुझा, कुमारकोम, आणि कोवलम यांसारखी ठिकाणं फॅमिली ट्रिपसाठी योग्य आहेत. तुमचं कुटुंब निसर्गाच्या सौंदर्याचा अनुभव घेणं हे एक अनमोल संस्मरण ठरेल.

ऊटी
ऊटीला ‘लेडी ऑफ हिल्स’ म्हणून ओळखले जाते. हे ठिकाण तमिळनाडूतील नीलगिरी पर्वतरांगेत आहे. कुटुंबासोबत फिरायला येणारे हे एक सुंदर ठिकाण आहे. येथे ऊटी तलाव, बॉटनिकल गार्डन, डोड्डाबेट्टा पीक आणि नीलगिरी माउंटन रेल या ठिकाणांची सफर करू शकता. येथील शांत वातावरण तुमच्या कुटुंबाला खूप आवडेल.

जयपूर
जयपूर हे एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहर आहे. येथील किल्ले, महाल आणि संग्रहालये मुलांसाठी शैक्षणिक आणि मनोरंजक ठरतात. जयपूरमध्ये तुम्ही आमेर किल्ला, सिटी महाल, जल महाल आणि हवा महाल इ. ठिकाणे पाहू शकता. या शहराची रंगीबेरंगी संस्कृती आणि बाजार तुम्हाला आकर्षित करतील.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *