‘भर चौकात शंभर गोळ्या घाला’; संतोष देशमुखांचे फोटो पाहून मनोज जरांगे संतापले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। मंगळवार दि. ४ मार्च ।। बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फोटो समोर आले आहेत. फोटो समाजमाध्यमावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली आहे. दरम्यान, आता हे फोटो पाहून मनोज जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, संतोष अण्णाला कपडे काढून मारलं, त्यांचे फोटो पाहून काळीज हेलावून जातंय. एवढी क्रूरता करण्याचं धाडसं कसं झालं? आता तरी अजित पवार आणि फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना लाथ मारुन बाहेर काढावं, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. धनंजय मुंडे यांनी स्वतःहून आमदारकीसह सगळ्याच पदांचा राजीनामा द्यावा, स्वतःहून जेलमध्ये जावं अशी मागणीही जरांगे पाटील यांनी केली.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, “धनंजय मुंडे यांच्यावर जर भगवानबाबांचे संस्कार असतील, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे संस्कार असतील तर मनाने आमदारकीसह सर्व पदांचा राजीनामा द्यावा आणि यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीपाशी जाऊन राजीनामा दे. तू स्वतःहून जेलमध्ये जा. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी मुंडेंना लाथ मारून बाहेर काढावं. असं जर केलं नाही तर थू तुमच्या जिंदगीवर, असंही जरांगे पाटील म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *