महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। बुधवार दि. ५ मार्च ।। कमी झालेली वृक्ष आणि शहरातील वाढती वाहनसंख्या अन् त्यातून होणारे प्रदूषण याचा परिणाम म्हणून शहराचा पारा सलग दुसर्या दिवशी 39.6 अंशांवर गेला. त्यामुळे उष्णतेच्या लाटेत पुणे शहराने विदर्भ, मराठवाड्यालाही मागे टाकले आहे.
सलग दोन दिवस पुणे शहराचे कमाल तापमान राज्यात सर्वाधिक ठरले. कोरेगाव पार्क आणि लोहगाव या भागातील पारा मंगळवारी पुन्हा 39 अंशांवर पोहचला. त्याखालोखाल सोलापूर 38.9, परभणी 38, अकोला 38.6 अंशांवर गेले होते. राज्याच्या कमाल तापमानात गत चोवीस तासांत 3 ते 4 अंशांनी वाढ झाली असून कोकणला उष्णलहरींचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मंगळवारचे कमाल, किमान तापमान…
लोहगाव (पुणे) 39.6, (21.4) कोरेगाव पार्क (पुणे) 39 (20.7),सोलापूर 38.9 (21.5), मुंबई (कुलाबा) 31.8(24.2), सांताक्रूझ 35.3 (20.6), अलिबाग 31.7 (20), रत्नागिरी 34.4 (21.8), डहाणू 33.1(23), शिवाजीनगर (पुणे) 37.7(16), अहिल्यानगर 35.8 (15.5), जळगाव 36 (17.2), कोल्हापूर 37.1(22.2), महाबळेश्वर 31.7 (18.6), मालेगाव 35.8 (18.8), नाशिक 36.3 (17.3), सांगली 37.9 (21), सातारा 37.5 (19.1), सोलापूर 38.9 (21.5), धाराशिव 35.8 (21), छ. संभाजीनगर 37. (21), परभणी 38 (19.5), बीड 35.5 (18.5),अकोला 38.6 (19.9), अमरावती 36.8 (19.2), बुलढाणा 35(21.5), ब्रम्हपुरी 37.9(18), चंद्रपूर 38(21), गोंदिया 35.8 (17), नागपूर 36.9 (18.2), वर्धा 37.7(20.2), यवतमाळ 37.(18.6).