महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शुक्रवार दि. ७ मार्च ।। पुण्यात महिला दिनानिमित्त पीएमपीएलने मोठी घोषणा केली आहे. पुण्यात महिलांना पीएमपीएल बसने मोफत प्रवास करता येणार आहे. पुण्यातील १३ मार्गांवरून धावणाऱ्या बसमधून महिलांना मोफत प्रवास करता येणार आहे. महिला दिनाच्या दिवशी पीएमपीएल बसने महिलांना मोफत बससेवेचा लाभ घेता येणार आहे.
पीएमपीएलने महिला दिनानिमित्त खुशखबर दिली आहे. पुण्यात महिला दिनानिमित्त म्हणजे ८ मार्च रोजी पीएमपीएलच्या महिला विशेष बसमधून महिला प्रवाशांना मोफत प्रवास करता येणार आहे. पुण्यातील १३ मार्गांवरून धावणाऱ्या १५ बसमधून हा मोफत प्रवास करता येणार आहे. महिला दिनानिमित्त पीएमपीएलची महिलांसाठी मोफत सेवा असणार आहे.
कोणत्या मार्गावर असणार मोफत बस?
स्वारगेट ते हडपसर
स्वारगेट ते धायरी
कोथरूड डेपो ते पुणे स्टेशन
एन डी ए गेट ते मनपा भवन
कात्रज ते महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड
कात्रज ते कोथरूड
हडपसर गाडीतळ ते वारजे माळवाडी
भेकराईनगर ते मनपा भवन
मार्केटयार्ड ते पिंपळेगुरव
पुणे स्टेशन ते कोंढवा खुर्द
निगडी ते हिंजवडी
भोसरी ते निगडी
चिखली ते डांगे चौक
दरम्यान, पीएमपीएलने जाहीर केलेल्या घोषणेमुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. पीएमपीएलच्या घोषणेचा फायदा महिला, विद्यार्थिनींना होणार आहे. महिला प्रवाशांचा प्रवास सुलभ आणि अधिक सुरक्षित होण्यासाठी पीएमपीएल प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आलं आहे. पुण्यातील महिलांकडून मोठ्या प्रमाणात सार्वजनिक वाहतुकीचा वापर केला जातो. महिला दिनानिमित्त जाहीर केलेल्या या घोषणेमुळे महिला प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.