Cancer Treatment: कॅन्सरच्या उपचारांवर नवं संशोधन; अ‍ॅस्पिरीन रोखू शकणार कॅन्सरच्या गाठीची शरीरातील वाढ ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शुक्रवार दि. ७ मार्च ।। कॅन्सरसारखा गंभीर आजार झाला की अनेकांच्या पायाखालची जमीन सरकते. या आजाराला रोखण्यासाठी तज्ज्ञ सातत्याने नवं संशोधन करतायत. एका नवीन संशोधनामुळे कॅन्सरच्या रुग्णांसाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे. स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारी वेदनाशामक अ‍ॅस्पिरिन कॅन्सरचा प्रसार रोखण्यास मदत करू शकते, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

केंब्रिज युनिवर्सिटीतीस शास्त्रज्ञांना त्यांच्या अभ्यासात असं आढळून आलंय की, एस्पिरिन शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करून कॅन्सरशी लढण्यास मदत करते. दरम्यान डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय अ‍ॅस्पिरिन घेणं टाळण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

कसं काम करते एस्पिरीन?
संशोधकांना असं आढळून आलं की, ज्यावेळी कॅन्सरच्या पेशी मुख्य ट्यूमरपासून वेगळ्या होतात. त्यावेळी शरीराच्या इतर भागात पसरण्याचा प्रयत्न करतात तेव्हा अ‍ॅस्पिरिन ही प्रक्रिया रोखण्यास मदत करते. मेटास्टेसिस म्हणजे जेव्हा कॅन्सर शरीराच्या इतर भागात पसरतो तेव्हा तो धोकादायक ठरतो आणि मृत्यूचा धोका संभवतो.

शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये असलेल्या एका विशेष प्रकारच्या पांढऱ्या रक्तपेशी, ज्याला टी-सेल म्हणतात त्या कॅन्सरच्या पेशी ओळखू शकतात. याशिवाय त्या पेशी नष्टही करू शकतात. परंतु, रक्तातील प्लेटलेट्स या टी-पेशींचं काम रोखतात. अ‍ॅस्पिरिन प्लेटलेट्स निष्क्रिय करतात ज्यामुळे टी-पेशी कॅन्सरच्या पेशी ओळखण्यास आणि नष्ट करण्यास अधिक सहजपणे सक्षम होतात.

सगळ्या रूग्णांसाठी फायदेशीर?
मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अ‍ॅस्पिरिन घेणं धोकादायक ठरू शकतं, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. अ‍ॅस्पिरिनचं जास्त प्रमाणात सेवन केल्याने अंतर्गत रक्तस्त्राव आणि स्ट्रोक सारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. लंडनच्या क्वीन मेरी विद्यापीठाचे प्राध्यापक मंगेश थोराट यांनी सांगितलं की, या अभ्यासामुळे एक महत्त्वाचा दुवा जोडला गेला असून काही प्रश्नांची उत्तर सापडणं कठीण आहे.

टीप ; सामान्य माहितीवर आधारित लेख , कोणताही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *