महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शनिवार दि. ८ मार्च ।। राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचार वाढल्याचे बघायला मिळतंय. यावरूच संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केलीये. संजय राऊत म्हणाले की, आज जागतिक महिला दिन आहे. आज प्रधानमंत्र्यांनी दिल्लीत एक महिलांसोबत कार्यक्रम ठेवलाय. म्हणजे आम्ही कसे महिलांचे रक्षक आहोत, आम्ही कशी महिलांची काळजी घेतो, अशा प्रकारचे कार्यक्रम घेऊन नक्की प्रसिद्ध दिली जाते. पण महाराष्ट्राची जर अवस्था आपण काही महिन्यात पाहिली तर राज्यात होणारे अत्याचार देशात सर्वाधिक आहेत.
पुढे संजय राऊत म्हणाले, मंत्री यामध्ये सामील आहेत, सरकारी पक्षाचे लोक सामील आहेत. पोलिसांवर दबाव आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पंधराशे रूपये तुम्हाला दिले. म्हणजे महिला सुरक्षेत आहेत आणि आम्ही महिलांचे हितरक्षक आहोत, या भूमिकेत जर सरकार असेल तर हे सरकार संपूर्ण महाराष्ट्राची आणि महिला वर्गाची फसवणूक करत आहे. लाडकी बहीण योजना किती जास्त फसवी आहे हे सुद्धा आपण निवडून दिल्यानंतर पाहिले.
लाडक्या बहिणींना २१०० रूपये देणार होते. संबंधित खात्याच्या जा मंत्रिबाई आहेत, त्या देखील महिलाच आहेत. त्यांनी ते शक्य नाही सांगितले. ही महिलांची फसवणूक असेल. लाडकी बहीण योजना आल्यापासून वृद्ध कलाकारांना मानधन मिळत नसल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले. ते पुढे म्हणाले की, २१०० रूपये द्यायचे कबूल केले होते ना…मग लाडकी बहीण योजना फसवी नाहीये का? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला.
पुढे राऊत म्हणाले की, कृषी क्षेत्रात महाराष्ट्र पुढे आहे, त्याचे श्रेय सरकारने घेऊ नये, त्याचे श्रेय शेतकऱ्यांना द्यावे. आत्महत्या, कर्ज मागे टाकून शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रात आपले काम केले. उद्योग क्षेत्रात आपली पिछेहाट आहे. त्याचे कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यासमोर महाराष्ट्रातला उद्योग परराज्यात गेला. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात कसे युद्ध सुरू आहे हे स्पष्ट दिसतंय. त्यांना काहीही म्हणून द्या, असे म्हणताना संजय राऊत हे दिसले आहेत.
