महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। मंगळवार दि. ११ मार्च ।। राज्यातील मटण दुकानांना आता मल्हार सर्टिफिकेट देण्याची भूमिका मत्सोद्योग आणि बंदरेविकास मंत्री नीतेश राणे यांनी घेतली आहे. मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉमच्या माध्यमातून केवळ हिंदू समाजातील खाटीकांना हे सर्टिफिकेट मिळणार आहे. असे सर्टिफिकेट नसेल तर मांस खरेदी करु नका, असे आवाहन त्यांनी केले आहे.
दरम्यान, मंत्री राणे म्हणाले की, मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काची मटण दुकाने उपलब्ध होतील, शंभर टक्के हिंदू समाजाचा प्राबल्य असेल व विकणारा व्यक्ती देखील हिंदू असेल. कुठेही मटणामध्ये भेसळ झालेली आढळणार नाही. या प्रयत्नांमुळे हिंदू समाजातील तरुण आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील, हे निश्चित, असे त्यांनी म्हटले आहे. राणे यांच्या या भूमिकेनंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.