बाजारात लवकरच येणार ‘मेड इन इंडिया’ आयफोन 12

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – पुणे – दि. २० ऑगस्ट – : दिग्गज टेक कंपनी अ‍ॅपलने याआधी चेन्नईमधील फॉक्सकॉन प्लांटमध्ये आयफोन 11 आणि आयफोन एक्सआरचे उत्पादन सुरू केले होते. आता कंपनीने लवकरच बाजारात येणाऱ्या बहुप्रतिक्षित आयफोन 12 चे मॅन्युफॅक्चरिंग देखील भारतात करणार असल्याची माहिती समोर आली आहे. आयफोनच्या या मेड इन इंडिया मॉडेलचे उत्पादन बंगळुरू येथे केले जाईल. फोनचे स्वदेशी मॉडेल 2021 मध्ये भारतात उपलब्ध होईल.

आयफोन 12 चे उत्पादन भारतात होणार असल्याने याच्या किंमतीवर देखील परिणाम होईल. या फोनची किंमत मागील वर्षी लाँच झालेल्या आयफोन 11 पेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. भारतात आयफोन 12 चे उत्पादन ऑक्टोंबर 2020 पासून सुरू होईल. कंपनीच्या नवीन प्लांटमध्ये 1000 कर्मचाऱ्यांनी काम करण्यास सुरुवात देखील केली आहे.

अ‍ॅपल कंपनी भारतात आयफोन12 च्या उत्पादनासाठी 2900 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. भारतात या फोनचे प्रोडक्सन तायवानची विस्ट्रोन ही कंपनी करेल, जी अ‍ॅपलसाठी कॉन्टॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *