महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। बुधवार दि. १२ मार्च ।। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank Of India) काल मोठी घोषणा केली आहे. १०० आणि २०० रुपयांच्या नोटांमध्ये मोठा बदल करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता १०० आणि २०० रुपयांच्या नोटा बदलण्यात येणार आहेत. त्या लवकरच चलनात सक्रिय होणार आहे.
आता १०० आणि २०० रुपयांच्या नोटांवर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची सही असणार आहे. त्यानंतर आता नोटा लाँच केल्या जाणार आहे. याबाबत रिझर्व्ह बँकेने निवेदन जारी केले आहेत. या नवीन नोटांची रचना ही महात्मा गांधी यांच्या सीरीजमधील नोटांसारखीच असणार आहे.
रिझर्व्ह बँकेने पूर्वी जारी केलेल्या १०० आणि २०० रुपयांच्या नोटा कायदेशीर चलन म्हणून चालू राहतील. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला आहे.
नवीन नोटांची खासियत (New Notes)
या नवीन नोटांवर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची सही असणार आहे.
या नोटांची डिझाइन ही जुन्या सीरीजनुसार असणार आहे.
या नवीन नोटांचे रंग, पॅटर्न सर्वकाही सारखे असणार आहे.
जुने १०० ते २०० रुपये मान्य असणार आहे.
जुन्या नोटांचं काय होणार?
१०० आणि २०० रुपयांच्या नवीन नोटा चलनात येणार आहे. मात्र, जुन्या १०० आणि २०० रुपयांच्या नोटांचं काय होणार याबाबत अनेक प्रश्न विचारले जात आहेत. जुन्या नोटा या चलनात सक्रिय राहणार आहेत. त्यामुळे तुम्ही या नोटा वापरु शकतात. याचसोबत ५० रुपयांच्या नोटांवरदेखील गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची सही असणार आहे.