महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। गुरुवार दि. १३ मार्च ।। महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. फेब्रुवारी महिन्याचे पैसे ८ मार्चच्या आधी जमा झाले होतो. त्यानंतर आता मार्च महिन्याचा हप्ता आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. काल १२ मार्च रोजी अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत.
लाडकी बहीण योजनेत (Ladki Bahin Yojana) ८ मार्च महिला दिनाच्या मूहूर्तावर महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वितरीत करण्यात आला आहे. त्यानंतर ७ ते १२ मार्चपर्यंत दोन टप्प्यांमध्ये मार्च महिन्याचाही हप्ता दोन्ही महिन्याचे हप्ते दिले जाणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान, आता लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे पैसे येण्यास सुरुवात झाली आहे.
तुम्हाला पैसे आले का?
महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्यावर बँकेचा मेसेज येतो. यावर १५०० रुपये क्रेडिट असा मेसेज येतो. जर हा मेसेज आला असेल तर तुम्हाला पैसे आले आहेत. याचसोबत तुम्ही तुमच्या बँकिंग अॅपवरुनही पैसे आलेत की नाही हे चेक करु शकतात.ऑफलाइन पद्धतीने बँकेत जाऊन अकाउंटमध्ये किती पैसे आहेत ते चेक करा. जेणेकरुन तुम्हाला समजेल की पैसे जमा झालेत की नाही.
जर पैसे जमा झाले नसतील तर
जर लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले नसतील तर त्यांचे अर्ज कदाचित बाद झालेले असू शकतात. या महिलांनी निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला असेल म्हणून त्यांना हे पैसे आले नसतील. जर तुमचे अर्ज बाद झाले असतील तर पुढचा कोणताही हप्ता तुम्हाला मिळणार नाहीये.