Train Hijack: पाकिस्तानचा रडीचा डाव; ट्रेन अपहरणामागे भारताचा हात, पंतप्रधान शहबाज यांचा आरोप

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शुक्रवार दि. १४ मार्च ।। बलुचिस्तान प्रांतातील रेल्वे अपहरणाच्या घटनेमागे भारताचा हात असल्याचा आरोप पाकिस्तानने केलाय. बलूचच्या बंडखोरांसमोर शहबाज सरकारने गुडघे टेकल्याचं दिसलं होतं. बंडखोरांसमोर लाचार झालेल्या शाहबाज सरकारने आपला कमकुवतपणा झाकण्यासाठी नवी रणनीती अवलंबलीय. ट्रेन अपहरणाचा आरोप शेजारील राष्ट्रावर केलाय. अपहरणात अफगाणिस्तानचा हात असल्याचा आरोप आधी केला होता. आता या घटनेसाठी भारत जबाबदार असल्याचा आरोप पाकिस्तानने केलाय.

दोन ते तीन दिवसांपूर्वी बलुचिस्तानमधील बोलानमध्ये बलूच बंडखोरांनी जाफर एक्स्प्रेसचे अपहरण केले होते. त्यात सुमारे साडेचारशे प्रवासी होते. यात २१ प्रवाशांसह ५८ जणांचा मृत्यू झाला तर पाक सैनिकांनी ३३ बलुच बंडखोरांना ठार केले. बलुचिस्तान प्रांतातील रेल्वे अपहरणाच्या घटनेमागे भारताचा हात असल्याचा आरोप पाकिस्तानने केलाय.

बलूच बंडखोरांसमोर हतबल झालेल्या शहबाज सरकारने आधी रेल्वे अपहरणाचा आरोप अफगाणिस्तानवर केला होता. अपहरणकर्त्यांचा मास्तरमाईंड हा अफगाणिस्तानमध्ये बसला असल्याचं म्हटलं होतं. ट्रेन अपहरणाशी संबंधित कॉल अफगाणिस्तानातून आले होते. इस्लामाबादकडे याबाबतचे पुरावे आहेत, असं पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते शफकत अली खान यांनी म्हटलं होतं. त्यानंतर इस्लामाबादने दहशतवादाबाबत आपली भूमिका बदलली आहे, का?

असं पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाच्या प्रवक्त्याला विचारण्यात आलं. यावर शफकत अली खान म्हणाले की, आमच्या धोरणात कोणताही बदल झालेला नाही आणि वस्तुस्थितीही बदललेली नाहीये., पाकिस्तानविरुद्ध दहशतवादाला खतपाणी घालण्यात भारताचा हात आहे. याचा आपण संदर्भ देत होतो, की या घटनेत आमच्याकडे अफगाणिस्तानातून कॉल आल्याचे पुरावे आहेत.

मंगळवारी जाफर एक्स्प्रेसचे अपहरण करण्यात आले. तेव्हापासून, पाकिस्तानी लष्कर आणि शाहबाज सरकार थेट नाव न घेता भारतावर दोषारोप करत आहे. मात्र त्यांच्या देशाच्या लष्करी आणि गुप्तचर अधिकाऱ्यांच्या सुरक्षेतील गंभीर अपयशांबद्दल मौन धारण केलंय.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *