Maharashtra Heatwave : पुण्यात तापमानाचा पारा चाळीशी पार ; उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शुक्रवार दि. १४ मार्च ।। यंदाच्या उन्हाळ्यातील तापमानाचा रेकार्ड मोडला. पुणे शहरासह जिल्ह्यात उष्णतेच्या झळा जाणवत आहेत. पुणे शहरातील लोहगाव परिसरात गुरुवारी ४०.४ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद तर जिल्ह्यातील शिरूरमध्ये सुद्धा ४० शी पार केले आहेत. पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये ४१.३ अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पुणे शहरातील लोहगाव भागात ४०.४ इतक्या तापमानाची नोंद झाली. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आणखी २ दिवस पुण्यासह विदर्भातील काही जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहणार.

संभाजी नगर शहर आणि परिसराचे तापमान ३९.२ अंश सेल्सिअसवर गेले आहे. मार्च महिन्यातील सर्वात जास्त तापमानाची नोंद झाली आहे. शहर आणि परिसरात बुधवारचा तापमानाचा रेकॉर्ड काल म्हणजेच गुरुवारी मोडला.

काल तापमान रेकॉर्ड मोडत ३९.२ अंश सेल्सिअसवर कमाल तापमानाचा पारा होता. किमान तापमान २२ अंश सेल्सिअसवर होते. तापमान झपाट्याने वाढू लागले आहे. बुधवारचे तापमान ३७.२ अंश सेल्सिअस कमाल, तर २१.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. मार्चमधील १२ दिवसांत सहा वेळा उच्चांकी तापमानाची नोंद झाली. सकाळपासून ऊन तापलेले संभाजीनगर आणि परिसरामध्ये दिसत आहे.

महाराष्ट्र, राजस्थान आणि गुजरातमधील अनेक जिल्ह्यात उष्णतेची लाट तीव्र असल्याचे स्पष्ट झाले आहे. विदर्भात आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यवतमाळ अमरावती, अकोल्याच्या समावेश देखील आहे. महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्याती ब्रम्हपूरीत सर्वाधिक ४२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. तर अनेक शहरांमध्ये तापमान ४०, ४१ अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. विदर्भात आज तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा असल्यानं गरज असल्यास घराबाहेर पडावे, योग्य काळजी घ्यावे असे आवाहन केले आहेत.

राज्यात सर्वाधिक तापमानाची विदर्भातील ब्रम्हगिरी येथे नोंद झाली आहे. ब्रम्हगिरी येथे काल ४२ अंश डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. अकोला आणि नागपूर येथे सुद्धा ४१ अंश डिग्री तापमानाची नोंद झाली.

पुणे शहर आणि जिल्ह्यातील तापमान (डिग्री सेल्सिअसमध्ये)

शिरूर: ४१.३

लोहगाव: ४०.४

ढमढेरे: ४०.३

दुदुलगाव: ४०.१

कोरेगाव पार्क: ४०.०

वडगाव शेरी: ३९.९

मगरपट्टा: ३९.४

एन डी ए: ३८.८

शिवाजीनगर: ३८.७

पाषाण: ३८.७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *