Sunita Williams ना माघारी आणण्यासाठी नासा-SpaceX चं यान रवाना, पाहा कशी आहे मोहिम

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शनिवार दि. १५ मार्च ।। आठ एक दिवसांच्या मोहिमेसाठी अवकाशात गेलेल्या सुनिता विलियम्स यांच्या यानात बिघाड झाल्यानं त्यांचा तेथील मुक्काम वाढला आणि पाहता पाहता 9 महिन्यांचा काळ त्यांना पृथ्वीपासून दूर अवकाशातच मुक्काम करावा लागला. भारतीय वंशांच्या अंतराळवीर आणि नासासाठीच्या अनेक मोठ्या मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या विलियम्स अखेर पृथ्वीवर परतण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

विलियम्स आणि बुल विल्मोर या अंतराळवीरांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी नासा (NASA) आणि स्पेसएक्स (SpaceX) यांच्या संयुक्त विद्यमाने क्रू-10 मिशन लाँच करण्यात आलं आहे. ज्याअंतर्गत इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरून या दोन अंतराळवीरांना पृथ्वीवर परत आणलं जाणार आहे.

अमेरिकन प्रमाण वेळेनुसार शुक्रवारी सकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी फाल्कन 9 रॉकेचच्या माध्यमातून ही मोहिम लाँच करण्यात आली. ज्यामध्ये ड्रॅगन स्पेसक्राफ्ट असल्याचं सांगण्यात आलं. या मोहिमेअंतर्गत चार नवे अंतराळवीर अवकाशात पाठवण्यात आले, जे ISS वर कार्यरत राहतील आणि तिथं असणाऱ्या क्रू-9 च्या सदस्यांची मदत करतील. विलियम्स आणि विल्मोर यांना माघारी आणण्यासाठीच्या प्रवासातील हा एक अतीव महत्त्वाचा टप्पा असल्याचं म्हटलं जात आहे.

जूननंतर लांबलेला विलियम्स यांचा प्रवास
सुनिता विलियम्स आणि बुच विल्मोर 2024 मध्ये 5 जून रोजी बोईंग स्टारलायनरच्या मदतीनं इंटरनॅशनल स्पेस स्टेशन इथं पोहोचले होते. तिथं नासा आणि बोईंगल्या जॉइंट क्रू फ्लाइट टेस्ट मिशनसाठी काम करून त्यांनी आठवडाभरता परतणं अपेक्षित होतं. पण, काही तांत्रिक बिघाडांमुळे त्यांचा तेथील मुक्काम वाढतच गेला. यादरम्यान अवकाशात या अंतराळवीरांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला होता. त्यामुळं आता त्यांच्या परतीच्या प्रवासाकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *