महाकुंभच्या संगम तटावरील ‘ते’ दृश्य पाहून शास्त्रज्ञांना बसला सुखद धक्का!

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। रवीवार दि. १६ मार्च ।। प्रयागराजयेथील महाकुंभाच्या समारोपाच्या 15 दिवसानंतर एक गुड न्यूजसमोर आली आहे. संगम तटावर परदेशी पाहुण्यांचे आगमन झाले आहे. संगम तटावर मोठ्या प्रमाणात परदेशी पक्षांचे आगमन झाले आहे. साधारण पणे फेब्रुवारी अखेरीस मरत मायभूमीत जाणारे हे पक्षी 13 मार्च उजाडला असूनही अजूनही परतले नाहीत. त्यामुळं पक्षी शास्त्रज्ञदेखील आश्चर्यचकित झाले आहेत. परदेशी पक्ष्यांचा मुक्काम वाढणे याचा अर्थ संगम तटावरील पाणी आणि हवा शुद्ध असल्याचे प्रतीक आहे.

प्रत्येक वर्षी डिसेंबरच्या अखेरीस रशिया, सायबेरिया आणि पोलंडसारख्या थंड प्रदेशातून हजारोंच्या संख्येने परदेशी पक्षी संगम परदेशात येतात. फेब्रुवारीच्या अखेरीस त्यांचा मुक्काम असतो. मात्र या वर्षी 13 फेब्रुवारीपर्यंत पक्षांचा मुक्काम वाढला आहे. त्यामुळं हा वैज्ञानिकांसाठी सुखद आश्चर्याचा धक्का आहे. पक्षी शास्त्रज्ञ प्रो. संदीप मल्होत्रा यांच्या म्हणण्यानुसार, लॉरस रीडिबंडस प्रजातीचे हे परदेशी पक्षी प्रदूषणमुक्त जल आणि स्वच्छ हवेचे सूचक मानले जातात. हे पक्षी जर जल सुरक्षीत आणि पर्यावरणासाठी अनुकुल असले तरच मुक्काम करतात. त्यांची उपस्थिती याच गोष्टीचा संकेत देते की महाकुंभच्या दरम्यान गंगेचे पाणी स्वच्छ ठेवण्याचे प्रयत्न यशस्वी झाले.

उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण बोर्डच्या रिपोर्टनुसार, संगमक्षेत्रातील जल आणि वायू पहिलेच्या तुलनेत फारच शुद्ध आहे. गंगेत डॉल्फिनची वाढती संख्यादेखील जल स्वच्छतेचे प्रमाण आहे. गंगा नदीत आढळणारे गंगेटिक डॉल्फिनदेखील गंगा नदीतील पाणी शुद्ध असण्याचे संकेत मानले जातात.

पर्यावरण मंत्रालयाकडून जागतिक वन्यजीव दिवशी जारी करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, गंगा नदीतील डॉल्फिनची संख्या 6,324 झाली आहे. जे 2021मध्ये जवळपास 3,275 इतकी होती. फतेहपूर प्रयागराज ते पटनापर्यंत गंगेच्या प्रवाहात डॉल्फिनच्या संख्येत वाढ झाली आहे. याचा अर्थ गंगा नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेत सुधार झाला आहे.

महाकुंभ 2025च्या दरम्यान गंगेची स्वच्छता आणि प्रदूषण नियंत्रणासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने विशेष अभियान चालवण्यात येत आहे. नमामि गंगा योजनेंतर्गंत गंगेच्या पाण्यात नाल्यांचे पाणी टाकण्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. सरकारच्या या प्रयत्नांना यश येत असल्याचे दिसत आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार हिच स्थिती कायम राहिल्यास येत्या काही वर्षात गंगेचे पाणी आणखी स्वच्छ होईल.

पक्षीशास्त्रज्ञ आणि पर्यावरण तज्ञांचा असा विश्वास आहे की संगम परिसरात विदेशी पक्ष्यांची उपस्थिती आणि गंगेच्या डॉल्फिनच्या संख्येत वाढ हे सिद्ध करते की गंगा पूर्वीपेक्षा स्वच्छ झाली आहे. हे केवळ पर्यावरणासाठीच नाही तर पर्यटन आणि धार्मिक श्रद्धेच्या दृष्टीनेही एक सकारात्मक संकेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *