शरद पवारांनी धनंजय मुंडेंना इतकी वर्षे पाठिशी का घातलं?, अंजली दमानिया यांनी विचारला थेट प्रश्न

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। रवीवार दि. १६ मार्च ।। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया या आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. हेच नाही तर धनंजय मुंडे यांच्यावरही गंभीर आरोप केली होती आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल त्यांनी अनेक पत्रे पाठवली. संतोष देशमुखांची हत्या करतानाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा हा मुख्यमंत्र्यांकडे दिला. मात्र, आपण वैद्यकीय कारणामुळे राजीनामा देत असल्याचे देखील मुंडेंनी म्हटले.

अंजली दमानिया यांचा नवा खुलासा

अंजली दमानिया यांच्याकडून बीडची बदनामी केली जात असल्याचा आरोप लावला जातोय. आता नुकताच दमानिया यांच्याकडून मोठा आरोप करण्यात आलाय. अंजली दमानिया यांनी म्हटले की, बीडमधील सर्व अधिकारी बदला. शरद पवारांनी धनंजय मुंडेंना आधीच का धडा शिकवला नाही, असा प्रश्न दमानिया यांनी उपस्थित केला. काल शरद पवार हे बीडच्या परिस्थितीबद्दल बोलताना दिसले होते, त्याबद्दच दमानिया यांनी भाष्य केले.

अंजली दमानिया पुढे म्हणाल्या की, बीडमधील पोलिस विभागातील सर्व लोकांना बाहेर काढून त्यांना इतर जिल्हांमध्ये टाकावे आणि तिथे सर्वच पोलिस नवीन आणावीत. पक्षातील नेत्यांनी चुकीचे वागल्यास त्यांच्यावर कारवाई करावी. पाठीवर नाव लिहिल्याने काहीच फरक पडत नाही, तिथे सर्वांनाच सर्वांची जात माहिती आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये कोणीच कारवाई केली नाहीये, असेही दमानिया यांनी म्हटले आहे.

बीडच्या सर्व पोलिसांच्या बदल्यांची दमानिया यांनी केली मागणी

अंजली दमानिया या आष्टीमध्ये घडलेल्या एका घटनेबद्दल बोलताना दिसल्या. संतोष देशमुख हत्या प्रकरणासारखाच प्रकार परत एकदा घडल्याचा आरोप त्यांनी केलाय. धनंजय नागरगोजे प्रकरणावर त्यांनी भाष्य केले. गेल्या काही दिवसांपासून बीडमधील घटनांबद्दल बोलताना दमानिया या दिसत आहेत. सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले ऊर्फ खोक्या याचेही दमानिया यांनी काही व्हिडीओ हे सोशल मीडियावर शेअर केली होती, त्यांनी काही आरोपही केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *