महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। मंगळवार दि. १८ मार्च ।। धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास चांगलाच वाढलाय… त्यातच आता पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी 6 महिन्यात आणखी एका मंत्र्याची विकेट घेणार असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिलीय.
राज्यात प्रबळ विरोधी पक्ष नसतानाही महायुतीचे नेते अंतर्गत कुरघोड्यांमुळे हैराण असल्याचं दिसतंय… त्यातच सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडचं कनेक्शन समोर आल्यामुळे धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.. तर अधिवेशनात जयकुमार गोरे, जयकुमार रावल, माणिकराव कोकाटे यांच्यासह अनेक मंत्र्यांना विरोधकांनी घेरलंय.. त्यातच आता सुळेंनी एक मंत्र्याची विकेट जाण्याचा दावा केला असला तरी संजय राऊतांनी मात्र हा आकडा 7 ते 8 असल्याचं म्हटलंय.. तर रोहित पवारांनी भ्रष्ट मंत्र्यांबाबत आपल्याकडे पुरावे असल्याचं जाहीर केलंय..
एक नाही 7-8 मंत्र्यांचे बळी जाणार, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. ‘जयकुमार गोरेंसह अनेक मंत्र्यांसंबंधी माझ्याकडे पुरावे, असं आमदार रोहित पवार म्हणाले.
महायुतीत मंत्रिपद न मिळाल्याने नाराजांची मोठी फौज आहे.. त्यातच सत्ताधारी आणि विरोधकांच्या दबावामुळे अखेर धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला.. त्यानंतर आता आत्मविश्वास उंचावलेला विरोधी पक्ष कुणाची विकेट घेणार? कोणता मंत्री पत्नीच्या मागे लपतो? याबरोबरच विरोधी पक्षांना महायुतीतील नाराजीची फौजच दारुगोळा पुरवत आहे का? …याचीच चर्चा रंगलीय.