महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – पणजी – दि. २० ऑगस्ट – : महाराष्टाचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बुधवारी संध्याकाळी राजभवनात गोव्याच्या राज्यपालपदी कोकणी भाषेतून शपथ घेतली. मुंबई उच्च न्यायलयाचे प्रमुख न्यायाधीश दिपंकर दत्ता यांनी त्यांना गोपनियतेची शपथ दिली. गोवा पोलिसांकडून राज्यपालांना ‘गार्ड ऑफ ऑनर ‘देण्यात आला. राज्यपाल सत्यपाल मलिक यांची बदली मेघालयात करण्यात आल्याने गोव्याचा तात्पुरता कार्यभार महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, महसूल मंत्री जेनिफर मोन्सेरात, पंचायत मंत्री माविन गुदिन्हो, सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पावस्कर, सभापती राजेश पाटणेकर, ईडीसी अध्यक्ष तथा भाजपचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, माजी मंत्री राजेंद्र आर्लेकर, दामू नाईक, मुख्य सचिव परिमल राय (आयएएस), पोलिस महानिरीक्षक मुकेश कुमार मीना (आयपीएस) तसेच विविध विभागांचे सचिव व वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते. कोश्यारी हे कोकणीतून शपथ घेणारे पहिले राज्यपाल आहेत.