महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – संजीवकुमार गायकवाड – नांदेड : – दि. २० ऑगस्ट – : शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाचे दरवाजे उघडले गोदावरी दुथडी भरून वाहत आहे विष्णुपुरी प्रकल्प जुलै महिन्याच्या शंभर टक्के भरल्याने विष्णुपुरी प्रकल्पातून अनेकदा पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
गोदावरी नदी सिद्धेश्वर येलदरी गोदावरी पात्रात सोडले असता विष्णुपुरी प्रकल्पाचा 4 गेट पहिल्यांदाच यावर्षी सोडल्याने गोदावरी दुथडी भरून वाहत आहे सोमेश्वर इथून घेतलेले छायाचित्र
परंतु चार दिवसापासून पावसाने हजेरी लावल्याने वरच्या भागातील येलदरी व सिद्धेश्वर प्रकल्पातून दहा गेट सोडून पाण्याचा विसर्ग पूर्णा नदी पात्रात होत असून व पूर्ण परिसरात पाऊस पडत असल्याने आज दुपारी तीन वाजता विष्णुपुरी प्रकल्प उघडण्यात आली होते त्यातून पाण्याचा विसर्ग 42000 क्युमेक्स वेगाने गोदावरी पात्रात सोडला जात आहे परंतु पूर्णा परिसरात पाऊस पडल्याने आज तारीख 18 वार मंगळवार सायंकाळी आठ वाजता गेट उघडून पाण्याचा विसर्ग 66 हजार 524 क्युमेक्स वेगाने गोदावरी पात्रात जात असताना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे अशी माहिती कार्यकारी अभियंता निळकंठ गव्हाणे व स्वामी यांनी दिली आहे.