Today Gold Rate: सोनं सर्वसामन्यांच्या आवक्याबाहेर ; पहा भाव कुठे पोहचला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। गुरुवार दि. २० मार्च ।। मार्च महिन्यात सोनं पार उच्चांकच गाठताना दिसत आहे. मार्च महिवा सुरु झाल्यापासून सोन्याने आपली झळाळी कायम ठेवली आहे. मागील दोन्ही महिने सोनं भाव खाऊन गेल्यानंतर याही महिन्यात सोनं प्रचंड भाव खाताना दिसत आहे. आजही सोन्याची किंमत वाढलेलीच पाहायला दिसत आहे. सोन्याच्या भावाने आता ९० हजाराचा आकडाही गाठलेला पाहायला मिळाला.

सोन्याची वायदा किंमत
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर मागणी कमकुवत असल्याने सोन्याच्या वायदा किंमती ३०८ रुपयांनी वाढून ८८,८८७ रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे. सोन्याची किंमत पार दोन दिवसात दहा हजार रुपयांनी वाढलेला दिसली. सोन्याने दोन दिवसाआधी ९० हजारचा आकडा पार केलेला दिसला. प्रति १० ग्रॅमनुसार २४ कॅरेट सोन्याचा भाव ९०,६६० रुपये आहे तर २२ कॅरेट सोन्याचा भाव हा ८३,१०० रुपये आहे. सोन्याची किंमत सराफा बाजारातही गगनाला भिडलेली दिसत आहे.

चांदीचा वायदा किंमत
चांदीची चमक लाखापार पोहोचूनही वाढण्याची काही थांबतच नाही. आज चांदीचा एक किलोप्रमाणे १,०५,१०० रुपये इतका आहे. चांदीचा भाव सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेरच कधीच गेला आहे. चांदीचा दर कालच्या दिवशी १,०५,००० रुपये होता एका दिवसांत तब्बल १,०० रुपये वाढलेला दिसत आहे.

२२ कॅरेट सोन्याचा आजचा दर

शहर आजचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम) कालचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)
मुंबई ८३,१०० रुपये ८२,९०० रुपये
पुणे ८३,१०० रुपये ८२,९०० रुपये
नागपूर ८३,१०० रुपये ८२,९०० रुपये
कोल्हापूर ८३,१०० रुपये ८२,९०० रुपये
जळगाव ८३,१०० रुपये ८२,९०० रुपये
ठाणे ८३,१०० रुपये ८२,९०० रुपये

२४ कॅरेट सोन्याचा आजचा दर

शहर आजचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम) कालचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)
मुंबई ९०,६६० रुपये ९०,४४० रुपये
पुणे ९०,६६० रुपये ९०,४४० रुपये
नागपूर ९०,६६० रुपये ९०,४४० रुपये
कोल्हापूर ९०,६६० रुपये ९०,४४० रुपये
जळगाव ९०,६६० रुपये ९०,४४० रुपये
ठाणे ९०,६६० रुपये ९०,४४० रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *