महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शुक्रवार दि. २१ मार्च ।। मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळाली. यात सध्या लग्न सराईचे दिवस असल्याने बाजारांमध्येही सोने- चांदी खरेदीला मोठी पसंती आहे. पण सतत वाढणाऱ्या किंमतींमुळे ग्राहकही चिंतेत होते. काही दिवसांत १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याच्या दर जवळपास १ लाखांवर पोहोचला होता. मात्र आज २१ मार्च २०२५ रोजी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण दिसून आली आहे. आज सोन्याचा दर २७० रुपयांनी तर चांदीचा दर ६२० रुपयांनी कमी झाला आहे. पण तुमच्या शहरात सोन्या-चांदीचा दर नेमका काय आहे जाणून घेऊ…
देशात आज सोन्या-चांदीचा दर नेमका काय आहे? ( Gold-Silver Price On 21 March 2025)
बुलियन मार्केट वेबसाइटनुसार, आज देशात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ८८, ८६० रुपये आहे. तर २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ८१,४४६ रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर ९९१ रुपये आहे, तर आज १ किलो चांदीचा दर ९९,०१० रुपये झाला आहे. आदल्या दिवशीच्या तुलनेत सोन्या- चांदीच्या घसरण झाली आहे. यामुळे मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर सारख्या शहरांतही हे दर घसरले आहेत.
आज १ ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर विचारात घेतल्यास तो ८,८८६ रुपये आहे. तर २२ कॅरेटचा दर ८,१४६ रुपये आहे.
बुलियन मार्केट वेबसाईटनुसार जाणून घेऊया तुमच्या शहरांमधील सोन्या-चांदीचे दर
शहर २२ कॅरेट सोन्याचा दर २४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ८१, ३१८ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत ८८, ७१० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८१, ३१८ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ८८,७१० रुपये आहे.
नागपूर २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८१, ३१८ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ८८,७१० रुपये आहे.
नाशिक २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८१, ३१८ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ८८, ७१० रुपये आहे
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)