Pune Ropeways : पुण्यात ८ ठिकाणी रोप-वे होणार, कुठे अन् कुणाला फायदा होणार?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शनीवार दि. २२ मार्च ।। पुणे जिल्ह्यातील पर्यटन (Pune district’s tourism) वाढवण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यात ८ रोप वे तयार होणार आहे. त्यामुळे गर्दीची ठिकाणे, डोंगराळ प्रदेश आणि दुर्गम भाग जोडला जाणार आहे. सिंहगड शिवनेरी आणि राजगड या तीन किल्ल्यांवर रोप वे सेवा सुरू होणार आहे. त्याशिवाय जेजुरी, निमगाव खंडोबा, लेण्याद्री, भीमाशंकर या ठिकाणीही ‘रोप वे’ होणार आहे. रोप वे सुरू झाल्यामुळे पुण्यातील पर्यटनाला आणखी चालना मिळेलच. त्याशिवाय भाविकांना अवघ्या काही मिनिटांत मंदिरासह गड-किल्ल्यांवर पोहचता येणार आहे. पुण्यातील ८ पैकी ३ ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि उर्वरित ५ ठिकाणी ‘राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन लि.(एनएचएलएमएल) यांच्यावर ‘रोप वे’ची जबाबदारी दिली आहे.

राज्यात ४५ रोप वे –
राज्यातील रोपवेची कामे कार्यान्वित करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. एनएचएलएमएल (NHLML) मार्फत ४५ रोपवे ची कामे हाती घेण्यास मान्यता देण्यात आली. ही रोपवे ची कामे करण्याकरिता एनएचएलएमएल या यंत्रणेला ला आवश्यक जागा ३० वर्षाच्या भाडेपट्टीवर उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली. पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी रोप वे सुरू होणार आहे.

केंद्र सरकारच्या पर्वतमाला योजनेमार्पथ महाराष्ट्रातील ४५ रोप वेची कामं होणार आहेत. रोप वे मुळे देशातील आणि राज्यातील पर्यटनाला चालना मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने पर्यटनाला चालना देण्यासाठी खास योजना आखली आहे. गड किल्ले आणि देवस्थानावर रोप वे बांधण्यात येणार आहेत. रोप वे तयार झाल्यानंतर पर्यटन वाढेल. त्याशिवाय या रोप वे मुळे तळागाळातील आर्थिक सुधारणा होईल. महाराष्ट्र सरकारकडूनही या प्रकल्पाला मान्यता दिली असून कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.

पुण्यातील ८ रोप वे पैकी ३ हे जुन्नर तालुक्यात असतील. तर खेड तालुक्यात २ रोप वे तयार करण्यात येणार आहेत. पुणे जिल्ह्यात कोणत्या आठ ठिकाणी रोप वे सेवा सुरू होणार? The eight locations where ropeways will be built are

खंडोबा निमगाव Khandoba, Nimgaon (Khed Taluka)

भीमाशंकर Bhimashankar (Khed Taluka)

किल्ले शिवनेरी Shivneri (Junnar Taluka)

लेण्याद्री Lenyadri (Junnar Taluka)

दाऱ्याघाट (ता. जुन्नर) Darya Ghat (Junnar Taluka)

किल्ले राजगड – Rajgad (Velhe Taluka)

किल्ले सिंहगड Sinhagad (Pune Taluka)

जेजुरी (कडेपठार) Jejuri (Purandar Taluka)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *