महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। रविवार दि. २३ मार्च ।। कोकण, विदर्भातील पावसाचे अलर्ट क्षीण झाल्याने राज्यातील अवकाळी पावसाची शक्यता मावळली आहे. त्यामुळे रविवारपासून (दि. 23) राज्यात कोरडे वातावरण राहील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
गेल्या चार दिवसांपासून हवामान विभागाने राज्यातील कोकण आणि विदर्भाला मुसळधार पावसाचे यलो अलर्ट जारी केले होते. 22 ते 24 मार्चदरम्यान अवकाळीचा इशारा दिला होता. मात्र वातावरणात पुन्हा बदल झाला असून राज्यातील काही भागात फक्त ढगाळ वातावरण तयार झाले. मात्र शनिवारी सर्व अलर्ट क्षीण झाल्याने रविवारपासून राज्यात कोरडे वातावरण राहील, असा नवा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे.
राज्याचे शनिवारचे तापमान
सोलापूर 38.8(23),मुंबई (कुलाबा) 33.4(23.6), सांताक्रूझ 34(21.9), पुणे 36.8(15.4), लोहगाव, 38.4(19.6), अहिल्यानगर 36(15.5), जळगाव 35.8(20.2), कोल्हापूर 36.6(21.2), महाबळेश्वर 31.7(16.6), मालेगाव 36(17.8),नाशिक 34.7(16), सांगली 37.4(21),सातारा 36.7(18.4), सोलापूर 38.8(23), धाराशिव 38.2(20.4),छ. संभाजीनगर 35.2(20.6), परभणी 38.1(20.5), अकोला 37.7(20.8), अमरावती 38(19.5), बुलढाणा 33.5(21.6), ब—ह्मपुरी 38.2(20.4),चंद्रपूर 37.2, गोंदिया 35.2(20.6), नागपूर 38.2(19.8)