महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। रविवार दि. २३ मार्च ।। जगातील प्रत्येक देशाकडे सोन्याचे साठे आहेत. काही देशांकडे हजारो टन सोनं आहे, तर काही देशांकडे कमी प्रमाणात सोनं आहे. जगातील कुठल्या देशाकडे सोन्याचा किती साठा आहे असा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो. तुम्हाला देखील असा प्रश्न कधी पडला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आम्ही तुम्हाला जगातील सोन्याचा साठा सर्वाधिक असणाऱ्या टॉप १० देशांची यादी देणार आहोत. तसेच या देशांकडे किती सोनं आहे हे देखील सांगणार आहोत.
जगभरात सर्वाधिक सोन्याचा साठा अमेरिकेकडे आहे. एकट्या अमेरिकेकडे ८,१३३ टन सोनं आहे. याचबरोबर अमेरिका ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. अमेरिकेनंतर या यादीत जर्मनीचा नंबर लागतो. जर्मनीकडे ३,३५२ टन सोनं आहे. जर्मनीपाठोपाठ इटली, फ्रान्स, रशिया, चीन, जपान, भारत, नेदरलँड्स आणि तुर्कीये या देशांचा नंबर लागतो.