चीनच्या 7 लष्करी हवाई तळांवर भारताची करडी नजर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – नवीदिल्ली- दि. २१ ऑगस्ट – पुर्व लडाखमधील चीनसोबतच्या तणाणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय एजेंसी चीनच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहे. एजेंसीज लडाखपासून ते अरुणाचलपर्यंत एलएसीच्या पलीकडे चीनी लष्कराच्या हालचालींकडे लक्ष ठेवून आहे. चीनच्या कमीत कमी 7 लष्करी तळ भारतीय एजेंसीच्या रडारवर आहेत.

एएनआयच्या वृत्तानुसार सरकारी सुत्रांनी सांगितले की, आम्ही चीनच्या शिनजियांग प्रांत आणि तिबेट क्षेत्रात स्थित होटन, गार गुंसा, काश्गर, होप्पिंग, कोंका जोंग, लिंजी आणि पंगट या हवाई तळांवर लक्ष आहे. चीनच्या हवाई दलाने काही दिवसांपुर्वीच यातील काही हवाई तळांना अपग्रेट केले आहे.

सुत्रांनी सांगितले की, लिंजी हवाई तळ भारताच्या पुर्वोत्तर राज्यांच्या जवळ आहे व ते खासकरून हेलिकॉप्टर बेस आहे. चीनने हवाई तळांजवळ हेलिपॅड्स देखील तयार केलेले आहे. याचा उद्देश भागात हालचाली आणि क्षमता वाढवणे हा आहे.

चीनने लडाख आणि दुसऱ्या भागातील त्या बाजूला लढाऊ विमाने तैनात केली आहेत. यात सुखाई-30 लढाऊ विमानांचे चायनीज व्हर्जन आणि त्यांच्या काही स्वदेशी जे-सीरिज लढाऊ विमानांचा समावेश आहे. भारतीय सैन्याने देखील आपली लढाऊ विमाने एलएसीवर तैनात केलेली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *