महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। गुरुवार दि. २७ मार्च ।। भारताचे माजी क्रिकेटर आणि स्टार फलंदाज युवराज सिंहचे वडील योगराज सिंह हे अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत येत असतात. महेंद्र सिंह धोनीबाबत योगराज अनेकदा तिखट प्रतिक्रिया देतात आणि युवराजचं करिअर लवकर संपण्यासाठी ते अनेकदा धोनीला दोष देतात. योगराज सिंह (Yograj Singh) यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी धोनी (MS Dhoni) , विराट कोहली, रोहित शर्मा, अर्जुन तेंडुलकर आणि कपिल देव (Kapil Dev) इत्यादींबाबत भाष्य केलं.
विराट आणि रोहितबद्दल काय म्हणाले?
माजी क्रिकेटर असलेल्या योगराज सिंह यांना तरुवर कोहली मुलाखतीदरम्यान प्रश्न विचारला की, जर ते टीम इंडियाचे हेड कोच असते तर त्यांनी संघात काय बदल केले असते? त्यावर योगराज म्हणाले की, ‘जर मी अशी टीम इंडिया बनवेन जी अनेक वर्ष कोणाही विरुद्ध हरणार नाही’. योगराज पुढे म्हणाले की, ‘जर कोणी चांगलं परफॉर्म करत नसेल तर लगेच बोललं जातं रोहितला हटवा, कोहलीला हटवा, कोणालाही का हटवायचे? ते वाईट काळातून जात असतील तर त्यांची मदत करा. मी तर त्यांना म्हणेन या माझ्या मुलांनो मी तुमच्या सोबत आहे, चला रणजी खेळू, चला थोडी प्रॅक्टिस करू. रोहितला म्हणेन चल 20 किलोमीटर धाउयात, ट्रेकिंगला जाऊयात. पण कोणीही असं काही करायला तयार नाही प्रत्येक जणांना त्यांना बाहेर काढायचे आहे’. अर्जुन तेंडुलकरबाबत योगराज म्हणाले की, त्याला मी 6 महिन्यांच्या आत जगातला सर्वोत्कृष्ट फलंदाज बनवेन.
धोनीबाबत काय म्हणाले योगराज?
मुलाखतीत योगराज सिंहने महेंद्र सिंह धोनीबाबत सुद्धा प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले, रोहित कोहली अशी लोक नाहीत ज्यांना तुम्ही बाहेर करता, ते असे लोक आहेत ज्यांची तुम्ही काळजी घेता त्यांची केअर करता, त्यांना प्रेम देता. मी कधी त्यांच्यात आणि युवराज सिंहमध्ये अंतर केलं नाही. उदाहरण द्यायचं झालं तर एम एस धोनी सोबत सुद्धा असंच आहे, मी त्याला आपल्या मुलाप्रमाणे मानतो पण जे चुकीचं आहे ते चुकीचच आहे.
कपिल देवबाबत योगराज सिंहच वक्तव्य :
धोनी प्रमाणे कपिल देवबाबत सुद्धा योगराज सिंह यांनी अनेकदा तिखट प्रतिक्रिया देताना दिसतात. मात्र या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, मी कपिल देववरही माझं प्रेम आहे, पण त्याने जे केलं ते चुकीचं आहे, फक्त याला स्वीकारा. जेव्हा मला समजलं की त्याला हार्ट अटॅक आला आहे तेव्हा मी त्वरित दिल्लीला गेलो आणि खूप रडलो. माझी पत्नी आणि मुलं मला विचारत होती की तुम्ही एवढं का रडताय. तेव्हा मी म्हटलं माझ्या मित्रासाठी रडतोय, तो असा मरू शकत नाही. मी त्याला रात्रभर फोन केले आणि मग सकाळची मला समजले की तो आता बरा आहे.