सरकारच्या या योजनेत पत्नीच्या नावाने उघडा खाते, आपल्या पत्नीला आत्मनिर्भर बनवू शकता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – पुणे – दि. २१ ऑगस्ट – घरात तुम्ही एकटे कमवणारे असाल व पत्नी गृहिणी असल्यास घर चालवण्यास थोडीफार अडचण होते. आता केंद्र सरकारच्या या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही ही समस्या सोडवू शकता. सोबतच आपल्या पत्नीला आत्मनिर्भर बनवू शकता. यासाठी सरकारच्या राष्ट्रीय पेंशन योजनेत (एनपीएस) गुंतवणूक करता येईल.

पत्नीच्या नावाने उघडा नवीन पेंशन सिस्टम खाते –

पत्नीच्या नावाने राष्ट्रीय पेंशन योजनेत खाते खोलू शकता. एनपीएस खाते तुमच्या पत्नीला 60 वर्ष पुर्ण झाल्यावर संपुर्ण रक्कम देईल. सोबतच पेंशन स्वरूपात दर महिन्याला देखील काही रक्कम मिळेल. तुमच्या पत्नीला महिन्याला किती रक्कम मिळावी हे देखील तुम्ही निश्चित करू शकता. यामुळे पत्नीला वयाच्या 60 वर्षानंतर कोणावर अवलंबून राहावे लागणार नाही.

गुंतवणूक –

या खात्यात तुम्ही तुमच्या सुविधेनुसार दर महिन्याला किंवा वर्षाला रक्कम जमा करू शकता. 1000 रुपये भरून देखील खाते उघडता येईल. 60 वर्षात हे खाते मॅच्युअर होते. नवीन नियमांनुसार तुम्ही वयाची अट 65 देखील करू शकता.

कोण उघडू शकते खाते ?

एनपीएसमध्ये 18 ते 60 वयोगटातील कोणीही खाते उघडू शकते. यात Tier-I आणि Tier-II अशी दोन खाती आहेत. Tier-I एक निवृत्ती खाते आहे. हे खाते प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याने उघडणे अनिवार्य आहे. Tier-II वॉलेंटरी खाते आहे. ज्यात कोणीही पगार घेणारी व्यक्ती गुंतवणूक करू शकते व कधीही पैसे काढू शकते.

महिन्याला 60 हजार रुपयांचे पेंशन कसे मिळेल ?

जर तुम्ही वयाच्या 25व्या वर्षी हे खाते उघडल्यास 60 वर्षांपर्यंत म्हणजे पुढील 35 वर्ष तुम्हाला 5 हजार रुपये महिन्याला जमा करावे लागतील. तुमच्याकडून जवळपास 21 लाख रुपये जमा होतील. या एकूण रक्कमेवर अंदाजे 8 टक्के परतावा मिळाल्यास, एकूण राशी 1.15 कोटी रुपये होईल. यातून 80 टक्के रक्कमेतून एन्युटी (वार्षिकी दर) खरेदी केल्यास मुल्य 93 लाख रुपये होईल. लम्प सम किंमत देखील 23 लाख असेल. एन्युटी रेट 8 टक्के असल्यास वयाच्या 60 वर्षानंतर प्रत्येक महिन्याला 61 हजार रुपये पेंशन मिळेल. याशिवाय 23 लाख रुपयांचा फंड देखील मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *