महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – पी. के. महाजन – पुणे- दि. २२ ऑगस्ट – १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असणाऱ्या गणपती बाप्पाचं घरोघरी मोठ्या उत्साहात आगमन झालं आहे. अर्थातच शनिवारपासून गणेशोत्सवाच्या 2020 मंगलपर्वाची सुरुवात झाली आहे. यंदाच्या वर्षी परंपरागत गणेशोत्सवाचं चित्र काहीसं पालटलेलं आहे. अर्थातच याला कारण ठरत आहे ती म्हणजेकोरोना विषाणूच्या संसर्गामुळं उदभवलेली आव्हानाची परिस्थिती.

धर्म कुठलाही असो प्रतेक धर्मा च्या सणासुदीला जिकडे तिकडे आनंदी वातावरण होत असते!. प्रत्येक धर्मांत सुख शांती च्या रुढी परंपरा दिसतात, परंतु धर्माच्या नावाखाली स्वार्थ साधणारयांमूळे धर्माचे महत्व कमी होत असते. श्रद्धेच्या नावाखाली अज्ञानी लोकांना लुबाडले जाते. ज्या मुळे अज्ञानी लोक अंधश्रद्धे च्या आहारी जातात. त्यातूनच श्रेष्ठ कनिष्ठ , वरचा खालचा व अस्तीक नास्तीक असे वर्ग निर्माण होतात!!……. सुख शांती चे प्रतिक असणारया गणपती बाप्पाचे आज आगमण होत त्या निमित्ताने गणरायास प्रार्थना करतोय की सर्वांना चांगली बुद्धी दे आणि हा धर्मातील अंतर्गत मतभेद व धर्मा धर्मातील वितूष्टाची भावना मीटू दे.!!! गणपती बाप्पा मोरया!!!!!
गणेशोत्सवाच्या पर्वाला सुरुवात झाल्यामुळं मागील काही काळापासून असणाऱं कोरोनाचं सावट आणि नकारात्मक वातावरण काहीसं दूर राहून सर्वत्र आनंददायी माहोल पाहायला मिळेल अशीच आशा सर्वजण मनी बाळगून आहेत.