महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ एप्रिल ।। लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे. महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना सुरु केली होती. या योजनेत आत एप्रिलचा हप्ता कधी येणार याकडे महिलांचे लक्ष लागले आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. हे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा केले जातात. दरम्यान, आता एप्रिल महिन्याला हप्ता तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जमा होऊ शकतो.
लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत ९ हप्ते वितरित करण्यात आले आहेत. आता महिला १० व्या हप्त्याची वाट पाहत आहेत.लाडकी बहीण योजनेचा हप्ता रामनवमीपर्यंत दिला जाईल, अशा चर्चा होत होत्या. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
लाडकी बहीण योजनेत गेल्या ३-४ महिन्यांपासून शेवटच्या आठवड्यात पैसे वितरित केले जात आहेत. त्यामुळे या महिन्यातदेखील पैसे शेवटच्या महिन्यात येऊ शकतात.
एप्रिलचा हप्ता लांबणार?
लाडकी बहीण योजनेत एप्रिलचा हप्ता लांबण्याचीदेखील शक्यता आहे. आयकर विभागाने अद्याप लाडकी बहीण योजनेत महिलांच्या उत्पन्नाची माहिती दिलेली नाही. त्यामुळे २ कोटींपेक्षा जास्त महिलांच्या अर्जांची तपासणी करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे कदाचित एप्रिलचा हप्ता महागणार आहे. अर्जांची पडताळणी झाल्यानंतरच महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.
९ लाखांपेक्षा अधिक महिला अपात्र
लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची तपासणी केली जात आहे. या योजनेत तब्बल ९ लाखांपेक्षा जास्त महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. ही संख्या जास्त असण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यात किती महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. फेब्रुवारीपर्यंत ९ लाख महिलांचे अर्ज बाद केले होते. ही संख्या अजून वाढण्याचीदेखील शक्यता आहे.