महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ एप्रिल ।। आज १ एप्रिल २०२५. नवीन आर्थिक वर्षाला सुरूवात झाली आहे. नवीन आर्थिक वर्षाच्या प्रारंभासोबतच सोन्याच्या किमतीतही वाढ झाली आहे. ३१ मार्चच्या तुलनेत आज सोन्याच्या किमतीने उच्चांक उडी घेतली आहे. सोन्याच्या प्रति तोळा किमतीत ९०० रूपयांनी वाढ झाली आहे. दिल्लीत २४ कॅरेट सोनं प्रति तोळा ९२,००० रूपये इतके आहे. तर, मुंबईत सोनं प्रति तोळ्याची किंमत ९१,९०० इतकी आहे. तर, चांदीचा दर १,०३,९०० रूपये प्रति किलो आहे. चांदीच्या किमतीत कोणाताही मोठा बदल झालेला नाही.
दिल्ली मुंबईत सोन्याचा दर
मंगळवार, १ एप्रिल २०२५ रोजी दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ८४,४१० रूपये आणि २४ कॅरेट सोन्याचा भाव ९२,०७० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. मुंबईत सोन्याचा २२ कॅरेट सोन्याचा भाव ८४,२६० रूपये तर, २४ कॅरेट सोन्याचा दर ९१,९२० रूपये प्रति १० ग्रॅम आहे. कालच्या तुलनेत आज सोन्याच्या किमतीत ९०० रूपयांची वाढ झाली आहे.
बुलियन मार्केट वेबसाईटनुसार तुमच्या शहरातील पाहा सोन्याचा दर
मुंबई- २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ८१,७३९ रुपये आहे. तर, २४ कॅरेट सोन्याची किंमत ८१,१७० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे- २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ८१,७३९ रुपये आहे. तर, २४ कॅरेट सोन्याची किंमत ८१,१७० प्रति १० ग्रॅम आहे.
नागपूर- २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ८१,७३९ रुपये आहे. तर, २४ कॅरेट सोन्याची किंमत ८१,१७० प्रति १० ग्रॅम आहे.
नाशिक- २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ८१,७३९ रुपये आहे. तर, २४ कॅरेट सोन्याचा दर ८१,१७० रूपये इतके आहे.