महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ एप्रिल ।। एप्रिल 2025 मध्ये तब्बल 16 दिवस बँका बंद राहणार आहेत. मात्र या सुट्ट्या संपूर्ण देशभरात लागू असणार आहेत. तर राज्यानुसार सुट्ट्या कमी-जास्तदेखील होऊ शकतात.
एप्रिल महिन्यात येणारे सण-उत्सव, महापुरुषांची जयंती या निमित्त या सुट्टया असणार आहेत. त्याचबरोबर शनिवार-रविवारदेखील सुट्टी असतील. एप्रिल महिन्यात 16 दिवस सुट्ट्या आल्याने नागरिकांना बँकेच्या कामांचे नीट नियोजन करावे लागणार आहे. सुट्ट्यांच्या तारखांची नोंद करुन त्यानुसार तुम्हाला कामांचे नियोजन करावे लागणार आहे. जर तुम्हाला बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम करायचे असेल तर त्याचे आधीच नियोजन करा. कारण शनिवार आणि रविवारला जोडून सुट्टी आल्याने सलग तीन दिवस बँका बंद राहू शकतात. सु्ट्ट्याची यादी एकदा पाहाच.
कधी बँका बंद राहणार
1 एप्रिल- वार्षिक लेखाबंदी- संपूर्ण देशभरात सुट्टी
5 एप्रिल- बाबू जगजीवनराम जयंती- हैदराबाद
6 एप्रिल- रविवार – देशभरात
10 एप्रिल महावीर जयंती – देशभरात
12 एप्रिल दुसरा शनिवार – देशभरात
13 एप्रिल रविवार – देशभरात
14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती – देशभर
16 एप्रिल बोहाग बिहू गुवाहाटी
18 एप्रिल गुड फ्रायडे चंदीगड, श्रीनगर वगळून संपूर्ण देशभरात
20 एप्रिल रविवार देशभर
21 एप्रिल गरिया पूजा आगरतळा
26 एप्रिल चौथा शनिवार देशभर