पैसे डबल करणारी पोस्टाची योजना; ₹५ लाख गुंतवल्यास होतील १० लाख रूपये

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ एप्रिल ।। भविष्यात आर्थिक अडचणी येऊ नयेत, म्हणून आपण खूप आधीपासूनच प्लानिंग करायला हवे. आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करायला हवी. अनेक सरकारी योजना, पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला जबरदस्त परतावा मिळतो. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला भविष्यात कधीही आर्थिक अडचण येणार नाही. तुम्ही किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra) योजनेत गुंतवणूक करु शकतात. या योजनेत तुमचे पैसे डबल होणार आहेत.

किसान विकात्र पत्र योजनेत जर तुम्ही ५ लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला १० लाख रुपये मिळणार आहेत. फक्त ११५ महिन्यात तुमचे पैसे डबल होणार आहेत. ११५ महिने म्हणजे जवळपास साडेनऊ वर्षात तुम्हाला हा रिटर्न मिळणार आहे. या योजनेत जर तुम्ही खूप कमी वयात पैसे गुंतवले तर तुम्हाला लवकरात लवकर चांगला परतावा मिळणार आहे.

पैसे डबल करणारी योजना (Kisan Vikas Patra Scheme)
पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र योजनेत कोणतीही रिस्क नाही. तुम्ही एकदम सुरक्षित गुंतवणूक करु शकतात. या योजनेत तुम्हाला गॅरंटीड रिटर्न मिळणार आहे.

या योजनेत सरकारी तिमाही आधारावर व्याज दिले जाते. हे व्याज बदलत असते. त्यामुळे व्याज वाढले तर तुमचे पैसेदेखील वाढू शकतात. सध्या या योजनेत व्याजदर ७.५ टक्के आहे. जर तुम्ही ७.५ टक्क्यांनी कॅल्क्युलेशन केले तर तुम्हाला ११५ महिन्यात १० लाख रुपये मिळणार आहे.

याआधी या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी १२३ महिन्यांचा होता. त्यानंतर १२० महिने करण्यात आला. दरम्यान, आता या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी ११५ महिने करण्यात आला आहे. या योजनेचा लाभ घेतल्यावर तुम्हाला फक्त फायदाच होणार आहे.

या योजनेत तुम्ही सिंगल, डबल असे दोन्ही अकाउंट उघडू शकतात. या योजनेत तुम्ही कितीही अकाउंट ओपन करु शकतात. त्याची काहीही मर्यादा नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *