महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ एप्रिल ।। लोणावळा – मळवली रेल्वे विभागातील उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी तीन दिवसीय ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक ६ ते ८ एप्रिल दरम्यान घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. या ब्लॉक कालावधीत लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात आणि पुणे लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
या ब्लॉकचा परिणाम एक्सप्रेससह लोकल गाड्यांवर होणार असून, काही गाड्या शॉर्ट टर्मिनेटही केल्या जातील. तर, काही वेळापत्रकानुसार नियमित केल्या जातील.
मध्य रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा-मळवली विभागातील अप आणि डाऊन मार्गावर ४ स्टील गर्डर्सच्या उभारणीसाठी हा ब्लॉक आवश्यक असून, पायाभूत सुविधा आणि प्रवासी सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
ब्लॉकचे वेळापत्रक आणि गाड्यांचे नियोजन
पहिला ब्लॉक – ६ एप्रिल (दुपारी १:०५ ते ४:०५)
सीएसएमटी–चेन्नई एक्सप्रेस (22159): लोणावळा येथे ४:०५ पर्यंत नियमित केली जाईल.
एलटीटी–काकीनाडा एक्सप्रेस (17222): कर्जत येथे ३:२० पर्यंत नियमित केली जाईल.
ग्वाल्हेर–दौंड एक्सप्रेस (22194): १० मिनिटांसाठी नियमित केली जाईल.
पुणे–लोणावळा ईएमयू व शिवाजीनगर–लोणावळा ईएमयू: मळवली येथे शॉर्ट टर्मिनेट.
लोणावळा–पुणे व लोणावळा–शिवाजीनगर ईएमयू: मळवलीहून सुटणार.
दुसरा ब्लॉक – ७ एप्रिल (दुपारी १:०५ ते २:३५)
शिवाजीनगर–लोणावळा ईएमयू: मळवली येथे शॉर्ट टर्मिनेट.
लोणावळा–पुणे ईएमयू: मळवलीहून सुटणार.
तिसरा ब्लॉक – ८ एप्रिल (दुपारी १:०५ ते ३:०५)
शिवाजीनगर–लोणावळा ईएमयू: मळवली येथे शॉर्ट टर्मिनेट.
लोणावळा–पुणे ईएमयू: मळवलीहून धावेल.