Ration Card KYC ! रेशन कार्डधारकांसाठी सरकारने घेतला हा निर्णय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ एप्रिल ।। रेशन कार्डधारकांसाठी (Ration Card) महत्त्वाची बातमी आहे. आता ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख आता वाढवण्यात आली आहे. रेशन कार्डधारकांसाठी केवायसी करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२५ होती. आता ही मुदत आणखी १ महिना वाढवून देण्यात आली आहे. आता तुम्गी ३१ एप्रिल २०२५ पर्यंत ई-केवायसी पूर्ण करु शकतात. रेशन कार्डधारकांसाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

रेशन कार्ड केवायसीची डेडलाइन वाढवली (Ration Card KYC Deadline Extended)
याबाबत विभागीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, चौथ्यांदा मुदतवाढ करण्यात येत आहे. ही शेवटची संधी असणार आहे. यानंतर रेशन कार्ड केवायसी करण्याची मुदत वाढवण्यात येणार नाही. त्यामुळे तुम्ही ३० एप्रिल २०२५ पर्यंत केवायसी करु शकतात.यानंतर कोणालाही केवायसी करता येणार नाही. यामुळे त्या व्यक्तीचे रेशन कार्ड रद्द होणार आहे. यामुळे त्यांना मोफत धान्य मिळणार नाही. सरकारने रेशन वितरण प्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी ही केवायसी करणे गरजेचे आहे.

५ लाखांपेक्षा जास्त लाभार्थी केवायसीपासून वंचित
आतापर्यंत ५ लाख रेशन कार्डधारकांना केवायसी केले नसल्याचे समोर आले आबे. यामध्ये किशनगंज जिल्ह्यात एकूण १५,७६,२२२ रेशनकार्डधारक नोंदणीकृत आहेत. त्यापैकी फक्त १० हजार नागरिकांची केवायसी पूर्ण झाली आहे. ५ हजारांपेक्षा जास्त रेशनकार्डधारकांची केवयासी प्रक्रिया अजून बाकी आहे. इतर अनेक राज्यांमध्येही हीच परिस्थीती आहे.अनेकजणांची केवासी केलेले नाही. त्यामुळे ही मुतवाढ करण्यात आली आहे.

रेशन कार्ड केवायसी कसं करायचं?
केवायसी तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने करु शकतात. तुम्हाला तुमच्या जवळच्या रेशन कार्ड दुकानात जायचे आहे तिथे रेशन कार्डची प्रत आणि आधार कार्ड दाखवायचे आहेत. तिथे जाऊन बायोमॅट्रिक पद्धतीने व्हेरिफिकेशन करायचे आहे.

तुम्ही ऑनलाइन पद्धतीनेही केवायसी करु शकतात.

तुम्हाला फक्त मेरा KYC आणि Aadhaar Face RD हा अॅप डाउनलोड करायचा आहे.

यानंतर तुम्हाला लोकेशन निवडायचे आहेत. तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर महाराष्ट्र निवडायचे आहे.

यानंतर आधार नंबर टाकायचा आहे.

यानंतर तुमचे फेस व्हेरिफिकेशन होईल. आणि तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *