चैत्रोत्सवानिमित्त सप्तश्रृंग गडासाठी दर १५ मिनिटांनी बस, कसं असेल नियोजन?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ एप्रिल ।। कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गडावर चैत्र पौर्णिमेची यात्रा असून भाविकांसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने जादा बसेसची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. एकूण अडीचशे बसेस या मार्गावर धावणार आहेत. नाशिक-सप्तशृंग गड मार्गावर दर १५ मिनिटांनी बस सुटणार असल्याची माहिती महामंडळातील सूत्रांनी दिली.

सप्तशृंग गड येथे दरवर्षी नवरात्राची यात्रा भरते. या यात्रेनिमित्त देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक येत असतात. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाने पुरेशा संख्येने बससेवा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार दि. ५ ते १३ एप्रिल या कालावधीत या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

या मार्गावर सर्वाधिक १२० बसेस धावणार…
नाशिक, मालेगाव, मनमाड, सटाणा, नांदगाव येथून सप्तश्रृंग गडासाठी बसेस सुटणार आहेत. याशिवाय नांदुरी ते सप्तशृंगी गड या मार्गावर सर्वाधिक १२० बसेस धावणार आहेत.

प्रत्येक पाच मिनिटाला एक बस
सप्तशृंगी गड ते नाशिक मार्गावर ६५, मालेगाव मार्गावर ४५, मनमाड मार्गावर १५ तर सटाणा मार्गावर पाच बसेस धावणार आहेत. नांदुरी पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी प्रत्येक पाच मिनिटाला एक बस सुटणार आहे. तर, नाशिकहून दर १५ मिनिटांनी सप्तशृंग गडाकडे बस सोडण्यात येणार आहेत. याशिवाय ई-बसद्वारे दिवसभरात ३६ फेऱ्या होणार असल्याची माहिती महामंडळातील अधिकृत सूत्रांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *