महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – मुंबई – दि. २३ ऑगस्ट – गेल्या दोन महिन्यात ऐतिहासिक भरारी घेतलेल्या सोन्याचा दर या महिन्यात पुन्हा खाली येऊ लागला आहे. त्यातल्या त्यात या आठवड्यात सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. सध्या 10 ग्राम सोन्याचा दर 52 हजार 001 रुपयांवर स्थिरावला आहे, तर 1 किलो चांदीचा दर 66 हजार 954 रुपये झाला आहे.
ऑगस्ट महिन्यात सोन्याच्या दराने ऐतिहासिक टप्पा गाठला होता. 7 ऑगस्टला सोन्याचा दर प्रति 1 तोळ्यासाठी (10 ग्राम) 56 हजार 200 रुपयांवर पोहचला होता. मात्र 15 दिवसात सोन्याचा भाव जवळपास 4 हजार 200 रुपयांची खाली आला आणि 52 हजार 001 रुपयांवर स्थिरावला. तसेच येत्या काही दिवसात हा दर 50 हजारांच्याही खाली येण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याचा दर खाली येताना दिसत आहे. प्रति औस सोन्याचा दर 2000 डॉलरच्या खाली आला आहे. सध्या हा दर 1,942 डॉलर प्रति औस वर स्थिरावला आहे.
…तर 70 हजारांवर जाणार सोने
जागतिक पातळीवर अमेरिका-चीनमध्ये असणारा तणाव, कोरोना विषाणूचा प्रभाव येत्या काळात कमी न झाल्यास सोन्याचा दर वाढण्याची शक्यता आहे. लोक सोन्याच्या गुंतवणुकीला प्राधान्य देत असल्याने दिवाळी पर्यंत सोने 70 हजारांवर जाऊ शकतात .