पंधरा दिवसांत नवीन टोल धोरण येणार; नितीन गडकरींची मोठी घोषणा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ एप्रिल ।। राष्ट्रीय महामार्गांवरील टोलबद्दल येत्या पंधरा दिवसात नवीन धोरण आणले जाणार आहे. त्यानंतर टोलबद्दल तुमची कुठलीही तक्रार राहणार नाही, अशी घोषणा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी केली. तर, शेतजमिनींवरील दावे आणि त्याच्या कोर्ट केसेसमुळे मुंबई – गोवा महामार्ग रेंगाळला. या कामात खूप अडचणी आल्या. मात्र, आता या अडचणी सुटल्या असून, या वर्षीच्या जूनपर्यंत हा रस्ता शंभर टक्के पूर्ण होणार, असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला.

मुंबईच्या दादर येथील अमर हिंद मंडळाद्वारे आयोजित ७८व्या वसंत व्याख्यानमालेला संबोधित करताना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी देशातील रस्ते वाहतुकीवर विस्ताराने भाष्य केले. मुंबई गोवा महामार्गाबाबत बोलताना गडकरी म्हणाले, कोकणातले सत्य सांगितले तर चालणार नाही, मात्र तीन एकर शेतीचे १४-१५ मालक आणि त्यात कोणी सामोपचाराने ऐकून घ्यायला तयार नाही अशी स्थिती होती भावाभावातच जमिनीवरून वाद, भांडणे त्यातून कोर्ट केसेसे यामुळे जमिनीचा मोबदला देता देता पुरेवाट झाली. या रस्त्याचे दरही वाढला. मात्र आता अडचणी सुटल्याचे गडकरी यांनी सांगितले. देशात पैशाची कमी नाही आहे, तर इमानदारीने देशाकरता काम करणाऱ्यांची कमतरता असल्याची खंतही गडकरी यांनी बोलन दाखविली

सध्या मुंबई ते दिल्ली प्रवासासाठी सध्या ४८ तास ५० तास लागतात. पण, नरिमन पॉईंट ते दिल्ली हे बारा तासात करण्याचा रोड बांधून जवळपास पूर्ण केला आहे. केवळ महाराष्ट्रातील काम राहिले आहे. मधल्या काळात ठाणे आणि आदिवासी भाग तसेच वन-पर्यावरणाच्या काही अडचणी होत्या. त्या सुटल्या आहेत आणि मुंबईपासून दिल्ली फक्त १२ तासात गाठता येणार आहे. दिल्ली ते जयपुर दोन तासात, नऊ तास लागणारे दिल्ली डेहराडून आता दोन तासात, बारा तासांचे दिल्ली ते अमृतसर चार तासांवर, बारा तासांच्या दिल्ली ते कटरा प्रवासाचा वेळ सहा तासांवर येणार आहे, असे गडकरी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *