महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ एप्रिल ।। येत्या ३० एप्रिल रोजी अक्षय तृतीया आहे. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. या दिवशी लोक आवडीने सोने खरेदी करतात. तुम्ही सुद्धा सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजच सोने बुक करा कारण गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. अक्षय तृतीयाला दहा ग्रॅम २४ कॅरेट सोने १ लाखाचा आकडा पार करू शकतात.
आज १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ९५,९०० रुपये तर चांदीचा दर ९५,७८० रुपये किलो आहे. सोने चांदीच्या दरात झपाट्याने वाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार असल्याचे दिसत आहे.
सोने चांदीचे दर (Gold silver rate today)
बुलियन मार्केटनुसार, आज २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ८७,९०८ रुपये आहे तर २४ कॅरेटसाठी ९५,९०० रुपये आहे. याशिवाय, १० ग्रॅम चांदीची किंमत ९५८ रुपये आहे म्हणजेच चांदी ९५,७८० रुपये प्रति किलोनी विकली जात आहे.
एक महिन्यापूर्वी सोन्याचा दर
गेल्या महिन्याभरात सोन्याचे दर झपाट्याने वाढलेले दिसून आले. एक महिन्यापूर्वी १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ८९,१४० रुपये होता तर आताची आकडेवारी पाहता सोने जवळपास ७.५८ टक्क्यांनी वाढले आहे. सोने साडेसहा हजाराने वाढले आहे.
बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर
शहर २२ कॅरेट सोन्याचा दर २४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ८७,८०८ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत ९५,७९० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ८७,८०८ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ९५,७९० रुपये आहे.
नागपूर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ८७,८०८ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ९५,७९० रुपये इतका आहे.
नाशिक प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ८७,८०८ रुपये आहे. ४ कॅरेट सोन्याचा दर ९५,७९० रुपये इतका आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)