Whatsapp Hacking Safety : कधीच हॅक होणार नाही तुमचं व्हॉट्सअ‍ॅप ! पोलिसांनी सांगितली भन्नाट ट्रिक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ एप्रिल ।। गेल्या काही दिवसांत व्हॉट्सअ‍ॅप हॅकिंगच्या घटना झपाट्याने वाढत असून सायबर गुन्हेगार या लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅपचा गैरफायदा घेत आहेत. या पार्श्वभूमीवर हरियाणा पोलिसांनी नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. हरियाणा पोलिसांनी एक सोपी आणि पद्धतशीर प्रक्रिया जाहीर केली आहे जी वापरकर्त्यांना हॅक झालेलं व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट परत मिळवण्यास मदत करू शकते.

व्हॉट्सअ‍ॅप हॅक झाल्यास काय करावे?

व्हॉट्सअ‍ॅप लगेच अनइन्स्टॉल करा – हॅकरचा थेट अ‍ॅक्सेस रोखण्यासाठी हे पाऊल आवश्यक आहे.

सिम कार्ड मोबाईलमधून काढा आणि हे सिम एका साध्या कीपॅड फोनमध्ये टाका.

वाई-फायवरून पुन्हा अ‍ॅप इन्स्टॉल करा – तुमच्या Android फोनमध्ये वाय-फाय वापरून व्हॉट्सअ‍ॅप पुन्हा इन्स्टॉल करा.

Call Me पर्याय निवडा – SIM नसलेल्या फोनवर व्हेरिफिकेशनसाठी “Call Me” पर्याय वापरा.

कोड मिळवून ते Android फोनमध्ये टाका – कोड मिळाल्यानंतर ते तंतोतंत Android फोनमध्ये टाका.

फोन रीस्टार्ट करा – आणि आता तुमचं व्हॉट्सअ‍ॅप परत सुरू होईल.

हॅकिंगपासून वाचण्यासाठी खबरदारीची पावलं

OTP कोणालाही देऊ नका – कोणतीही खात्रीशीर वाटणारी व्यक्ती असली तरीही नाही.

अनोळखी लिंकवर क्लिक करू नका – यामुळे फिशिंगचा धोका संभवतो.

पब्लिक Wi-Fi वापरणं टाळा – सार्वजनिक नेटवर्कवरून हॅकिंगची शक्यता अधिक असते.

अ‍ॅप वेळोवेळी अपडेट करा – सिक्युरिटीसाठी आवश्यक असलेले अपडेट्स नियमितपणे इंस्टॉल करा.

Two-Step Verification सुरू करा – हे अतिरिक्त संरक्षण तुमच्या अकाउंटला सुरक्षित ठेवेल.

हरियाणा पोलिसांच्या या मार्गदर्शक सूचना फक्त हरियाणातीलच नव्हे, तर देशभरातील व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. कारण व्हॉट्सअ‍ॅप आपल्या दैनंदिन जीवनाचा आवश्यक भाग आहे. त्यामुळे त्याची सुरक्षा महत्वाची आहे. सायबर हल्ल्यांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी सजग राहणं ही काळाची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *