धनंजय मुंडेंबाबत बीडचा निलंबित अधिकारी रणजीत कासलेचा गौप्यस्फोट; ‘माझ्या अकाऊंटला 10 लाख…’

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ एप्रिल ।। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. पुणे पोलिसांना शरण जाण्यासाठी ते पुण्यात दाखल झाली. रणजीत कासलेने गेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री धनंजय मुंडे, संतोष देशमुख खून प्रकरणातील प्रमुख आरोप वाल्मिक कराड यांचे नाव घेत गंभीर स्वरुपाचे आरोप करत आहेत. मला वाल्मिक कराडचे एन्काऊंटर करण्यासाठी ऑफर देण्यात आली होती, असा मोठा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर ते संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आले होते.

पुण्यात पोहोचल्यावर पत्रकारांशी बोलतानाही रणजीत कासलेने खळबळजनक आरोप केले आहेत. रणजीत कासले म्हणाले की, पुण्यात मी शरण जाण्यासाठीच आलो आहे. मी अजून 15 दिवस जरी गेलो असतो तरी मला कोणी पकडले नसते. परंतु मी माझ्या मित्रांशी बोलून हा निर्णय घेतला आहे. बीडला जाऊन मी शरण जाणार आहे. पुणे पोलिसांना तशी मी विनंती केली आहे की मला संरक्षण देऊन बीड पोलिसांच्या स्वाधीन करावे. दिल्लीत असताना मी पबमध्ये, लाल किल्ल्यात सगळीकडे जाऊन आलो. दिल्लीत असताना मी केंद्र स्तरावर ईव्हीएमवर चर्चा केली आहे. मतदानाच्या दिवशी दहा लाख रुपये ईव्हीएमपासून दूर राहण्यासाठी दिले होते, असा दावा कासले यांनी केला आहे.

एन्काऊंटरबाबत रणजित कासले काय म्हणाला?
एन्काऊंटरचा आदेश तुम्हाला दिला होता का? असे मला विचारले जात आहे. पण कोणी असा एन्काऊंटरचा आदेश देईल का? या सगळ्या चर्चा बंद दाराआडच्या चर्चा आहेत. मी जे पुरावे मी सादर करतोय, मला त्याबाबत विचारावे. ज्या दिवशी मतदान होतं. त्या दिवशी माझ्या बँक खात्यात दहा लाख रुपये आले.

वाल्मीक कराडची जी कंपनी आहे संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन कंपनी अंबाजोगाई येथे जात महादेव कराड आणि काळे हे पार्टनर आहेत त्यांच्या कंपन्यातून माझ्या अकाउंटला दहा लाख आले त्यातले सात लाख साडेसातला परत केले उरलेल्या अडीच लाखात माझे जे काही आहे ते सगळं करतोय. हे जे अडीच खर्च करतोय ते सुद्धा मी प्रामाणिकपणे परत करणार आहे. हे पैसे ईव्हीएम पासून दूर राहण्यासाठी होते जे काही ईव्हीएमला छेडछाड होईल ते दूर राहून गप्प बसून बघत राहायचं यासाठी हे पैसे पाठवण्यात आले होते.

माझ्या खात्यात ईव्हीएम आणि धनंजय मुंडे यांच्यापासून दूर राहण्यासाठी पैसे दिले होते. कराडच्या एन्काऊंटरची चर्चा बंद दारामागे करण्यात आली होती. परळीमध्ये माझी आणि वाल्मीक कराडची भेट झाली होती. बोगस एनकाऊंटर म्हणजे काय तर मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री सोबत येऊन चर्चा करतात, त्यानंतर एनकाऊंटर केला जातो, जसा अक्षय शिंदेचा करण्यात आला. तसेच अतिरिक्त पोलिस अधिकारी कराडचे हस्तक असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *