महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ एप्रिल ।। सोनं रिटर्न्सचा खरा ‘बादशाह’ ठरला आहे. करोनानंतर भारतीय शेअर बाजारात भरभराट झाली पण, गेल्या काही महिन्यांत देशांतर्गत मार्केटमध्ये प्रचंड चढ-उतार झाले. मात्र या काळात सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना ‘अच्छे दिन’ आले. दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचा भाव 98,170 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आजवरच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. कमकुवत डॉलर, व्यापार युद्ध आणि ट्रम्प यांच्या टॅरिफ घोषणांमुळे सोन्याच्या दरवाढीला आधार मिळाला असून सोने अधिक महाग होऊ शकते, काहींचा अंदाज आहे की ते प्रति औंस $3,500 पर्यंत जाऊ शकते असा तज्ञांचा विश्वास आहे.
सोन्याच्या दरवाढीचा नवीन उच्चांक
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत प्रचंड वाढ झाली असून गुरुवारी मौल्यवान धातूचा प्रति 10 ग्रॅम भाव 70 रुपयांनी वाढून 98,170 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला. कमकुवत डॉलर, चीन-अमेरिकेत व्यापार युद्धाची शक्यता आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ घोषणांमुळे सोन्याच्या दरवाढीचा बळ मिळाले आहे तसेच सोन्याचा भाव आणखी वाढेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
सोनं रिटर्न्सचा ‘बादशाह’
यावर्षाच्या सुरुवातीपासून सोन्याची किंमत नवनवीन विक्रम करत असून आतापर्यंत 60.06 टक्क्यांचा आकर्षक परतावा दिला आहे. अशाप्रकारे, यावरून सोन्याच्या किमती किती वाढल्या दिसून येते. गेल्या एका आठवड्यात सोन्याने 7.05% सकारात्मक परतावा दिला, जो अल्पावधीतही वाढीचा ट्रेंड दर्शवतो. तसेच गेल्या एका महिन्यात सोन्याने 13.16% आणि तीन महिन्यांत 52.50% परतावा दिला.
अशा परिस्थितीत, गेल्या काही दिवसांच्या दरवाढीचा कल आणि जागतिक परिस्थिती पाहता बाजारातील तज्ज्ञ सोन्यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवत आहेत. SD बुलियनचे वरिष्ठ बाजार विश्लेषक जेम्स अँडरसन म्हणतात की मे महिन्याच्या अखेरीस सोन्याचे भाव प्रति औंस 3,500 डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतात पण, नंतर $2,700 पर्यंत देखील घसरू शकतात. आदल्या दिवशी, गुरुवारी, सराफा बाजारात सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 98,170 रुपयांवर बंद झाला तर, बुधवारी सोन्याच्या किमतीत 1,650 रुपयांची मोठी वाढ झाली आणि दरांनी उच्चांकी पातळीवर झेप घेतली.
जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या काळात सोन्याकडे अनेकदा सुरक्षित आश्रयस्थान म्हणून पाहिले जाते. सध्या बाजारात अस्थिरता आहे आणि SIP गुंतवणुकीचा कल कमी होताना सोन्याकडे तेजीचा कल दिसून येत आहे. अशा परिस्थितीत, सोन्यात गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांनी काही महत्त्वाचे घटक आणि जोखीम घेण्याच्या क्षमतेचा विचार केला पाहिजे.